25 एप्रिल 2024 (चालू घडामोडी)

 

प्रश्न 1) अलीकडेच भारताच्या गीता सब्रवाल यांची कोणत्या देशाच्या UN च्या स्थानिक समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर – इंडोनेशिया

◾संयुक्त राष्ट्रांचे (The United Nations) सरचिटणीस, अँटोनियो गुटेरेस यांनी भारताच्या गीता सभ्रवाल (Gita Sabharwal) यांची इंडोनेशियामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या नवीन निवासी समन्वयक (UN Resident Coordinator) म्हणून नियुक्ती केली आहे.

◾ इंडोनेशिया (Indoneshia) : राजधानी – जकार्ता, राज्यभाषा – इंडोनेशियन, चलन – इंडोनेशियन रुपी

 

प्रश्न 2) जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन कधी साजरा करण्यात येतो?

उत्तर – 23 एप्रिल

◾ जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस (World Book and Copyright Day) : जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस दरवर्षी 23 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. हा दिवस वाचन, प्रकाशन, आणि कॉपीराइटला प्रोत्साहन देण्यासाठी UNESCO (United Nations Educational, Scientific and Cultural Organization) व्दारे दरवर्षी आयोजित करण्यात येतो. सर्वप्रथम हा दिवस 23 एप्रिल 1995 ला साजरा करण्यात आला होता.

 

प्रश्न 3) अलीकडेच कोणत्या देशाच्या नौदलाने पूर्वेकडील समुद्रकिनारी ईस्टर्न वेव्ह सराव केला?

उत्तर – भारत

◾भारतीय नौदलाने (Indian Navy) पूर्व नौदल कमांडच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंग – इन – चीफच्या ऑपरेशनल कंट्रोल अंतर्गत भारताच्या पूर्व किनारपट्टीवर ईस्टर्न वेव्ह सराव (Poorvi Lehar Exercise) केला. पूर्वी किनारपट्टीवरील प्रदेशातील सागरी सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय नौदलाने या ठिकाणी सराव केला.

 

प्रश्न 4) अलीकडेच IPL मध्ये 200 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण बनला आहे?

उत्तर – युजवेंद्र चहल

◾IPL (Indian Premier league) मध्ये 200 विकेट घेणारा युजवेंद्र चहल हा पहिला गोलंदाज ठरला आहे. युजवेन्द्र चहल सध्या राजस्थान रॉयल्स या संघा कडून खेळत असून,त्याने राजस्थान रॉयल्सच्या लेग स्पिनरने (युजवेंद्र चहल) जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यादरम्यान हा टप्पा गाठला असून, त्याने नवा विक्रम नोंदविला आहे. 33 वर्षीय चहलने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि आजपर्यंत त्याने या स्पर्धेत एकूण 153 सामने खेळले आहेत.

 

प्रश्न 5) अंतराळ प्रवासातील योगदानाबद्दल अलीकडेच कोणाला आर्यभट्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

उत्तर – पावलुरी सुब्बाराव

◾आर्यभट्ट पुरस्कार हा दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार असून, हा पुरस्कार भारतातील अंतराळ विज्ञान आणि एरोस्पेस तंत्रज्ञानाच्या (Astronautics and Aerospace Technology) क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. या वर्षीचा पुरस्कार हा पावलुरी सुब्बाराव (Pavuluri Subba Rao) यांना जाहीर झाला.

 

प्रश्न 6) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या SIPRI अहवालानुसार, कोणत्या देशाचा लष्करावर सर्वाधिक खर्च होतो?

त्तर – यूएसए (USA)

◾Stockholm International Peace Research Institute (SIPRI) व्दारे हा अहवाल सादर केला असून, हा अहवाल कोणता देश आपल्या लष्करावर किती खर्च करतो याबद्दल माहिती देते. या अहवालानुसार अमेरिका हा देश आपल्या लष्करावर सर्वाधिक खर्च करतो. तर अमेरिकेनंतर चीन आणि रशियाचा नंबर लागतो. भारत हा जगातील चौथा सर्वाधिक खर्च करणारा देश असून २०२३ मध्ये भारताने आपल्या लष्करावर ८३.६ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत.

 

प्रश्न 7) लक्ष्मणतीर्थ नदी कोणत्या राज्यात अलीकडचा दुष्काळ आणि अतिउष्णतेमुळे कोरडी पडली आहे?

उत्तर – कर्नाटक

◾ कर्नाटक : राज्याची स्थापना – १ नोव्हेंबर १९५६, राज्यभाषा – कन्नड, राजधानी – बंगळुरू,

लक्ष्मणतीर्थ नदी कर्नाटक राज्यात आहे.

 

प्रश्न 8) हेव्हनली आयलंड ऑफ गोवा सॉल्ट हे पुस्तक अलीकडे कोणी लिहिले आहे?

उत्तर – पी एस श्रीधरन पिल्लई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Explore More

महाराष्ट्र भूषण पुरस्कार

महाराष्ट्र भूषण पुरस्कार या लेखात आपण महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार असून, नुकताच 30 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023

चालू घडामोडी (26 एप्रिल 2024)

26 एप्रिल 2024 चालू घडामोडी   प्रश्न १) नुकताच राष्ट्रीय पंचायती राज दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 24 एप्रिल ◾ पंचायती राज दिवस हा भारतातील पंचायती राज व्यवस्थेचा

चालू घडामोडी (06 मे 2024)

चालू घडामोडी (06 मे 2024)   ०६ मे २०२४ रोजीच्या, महत्वपूर्ण चालू घडामोडी ज्यात राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय, खेळ, महत्त्वाच्या संस्था, सरकारी योजना, राजकीय, सामाजिक, इत्यादी घटकावर आधारित तसेच परीक्षेला