शासकीय योजना

या लेखात आपण केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण योजना पाहणार आहोत. जे की आगामी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. परीक्षेत शासकीय योजनेवर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे महत्त्वाच्या शासकिय योजना आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. यात आपण केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या योजना तसेच महत्त्वाच्या योजना व सोबतच इतर राज्यातील विविध योजना याबद्दल माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाने सुद्धा काही योजना सुरू केल्या आहेत त्याबाबत सुध्दा आपण माहिती पाहूयात. योजनेबाबत माहिती पाहत असताना योजनेचे नाव, त्याची सुरुवात कधी झाली, त्याची उद्दिष्ट इत्यादी घटक आपण अभ्यासणार आहोत.

१) ‘मेरा युवा भारत (MY BHARAT)’ मंच योजना
◆ सुरुवात : 31 ऑक्टोबर 2023 रोजी
– राष्ट्रीय एकता दिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील तरुणांना समर्पित ‘मेरा युवा भारत मंच’ अधिकृतपणे सुरू केले
– ‘मेरा युवा भारत (माय इंडिया)’ ची कल्पना भारतातील युवकांच्या विकासासाठी आणि नवीन तरुण पिढीच्या नेतृत्वाखालील विकासासाठी एक महत्त्वाची, तंत्रज्ञान-संचालित सक्षमकर्ता म्हणून याची सुरुवात करण्यात आली आहे.
– याचा उद्देश तरुणांना त्यांच्या आकांक्षा महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी सोबतच समान संधी प्रदान करण्यासाठी एक मंच प्रदान करणे होय.

 

२) लखपती दीदी योजना
◆ घोषणा : 15 ऑगस्ट 2023 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात या योजनेची घोषणा केली.
– महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
– या योजनेचा उद्देश हा खेड्यातील / ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे तसेच देशभरातील 2 कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे आहे.
– या योजने अंतर्गत विविध प्रशिक्षण दिले जाते , LED बल्ब बनविणे, प्लुम्बिंग, ड्रोन चालविणे, ड्रोन दुरुस्ती इत्यादी …

 

३) प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना
◆ सुरुवात : 17 सप्टेंबर 2023 रोजी
– या योजने अंतर्गत समाजातील निम्नस्तरातील अठरा प्रकाराच्या कामगारांच्या / व्यापारी वर्गांना त्यांच्या पारंपरिक कौशल्य विकासासाठी भारत सरकार लोन देते.
– पारंपारिक कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
– या योजनेचा लाभ सोनार, लोहार, नाई इत्यादी पारंपारिक कौशल्ये असलेल्या कारागिरांना दिला जातो.
– ही केंद्रीय योजना नरेंद्र मोदी यांनी कामगारांच्या विकासासाठी सुरू केली आहे.

 

४) राष्ट्रीय हरित पत कार्यक्रम
◆ सुरुवात : 13 ऑक्टोबर 2023 रोजी
– हा कार्यक्रम व्यापक ‘LiFE’ (पर्यावरणीय जीवनशैली) मोहिमेचा एक भाग आहे आणि स्वयंसेवी इको-फ्रेंडली कृतींना प्रोत्साहन, योगदान आणि पुरस्कार प्रदान करते.
– ही यंत्रणा व्यक्ती समुदाय किंवा खाजगी क्षेत्रातील विविध भागधारकाद्वारे विविध क्षेत्रांमध्ये स्वयंसेवी पर्यावरणीय कृतींना सकारात्मक पर्यावरणीय योगदानाबद्दल पुरस्कृत प्रोत्साहन देण्यासाठी डिझाईन केलेली आहे.
– या कार्यक्रमाचा उद्देश पर्यावरणावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींना प्रोत्साहन प्रदान करणे होय.

 

५) नवभारत साक्षरता कार्यक्रम
◆ सुरुवात : 1 एप्रिल 2023
– नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा उद्देश हा भारतातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील व्यक्तींना साक्षर करणे हा आहे.
– लोकांमध्ये साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
– या कार्यक्रमाअंतर्गत, 2022-23 ते 2026-27 या कालावधीत देशभरातील 5 कोटी निसाक्षरांना समाविष्ट केले जाईल आणि त्यांना साक्षर केले जाईल.

 

६) आयुष्यमान भव: मोहीम
◆ सुरुवात : 13 सप्टेंबर 2023
– राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी गांधीनगर, गुजरात या ठिकाणी आयुष्यमान भव: मोहीमेची सुरूवात केली.
– आयुष्मान भव: मोहीम हे एक व्यापक देशव्यापी आरोग्य सेवा उपक्रम असून याचा उद्देश प्रत्येक गाव आणि शहरापर्यंत आरोग्य योजनांचे लाभ पोहचविणे आहे.
– आयुष्मान भव: अभियाना अंतर्गत आयुष्मान कार्ड वाटप करणे, आभा आयडी उपलब्ध करून देणे, महत्वाच्या आरोग्य योजना आणि रोगविषयक परिस्थिती, जसे की असंसर्गजन्य रोग, क्षयरोग आणि सिकलसेल रोग याबद्दल जागरूकता वाढवणे हे उद्दिष्ट आहे.

 

७) लेक लाडकी योजना
◆ सुरुवात : मार्च 2023
– तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023 या वर्षाच्या अर्थसंकल्पात ही योजना सुरू करण्याची घोषणा केली होती.
– ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेच्या जागी ‘लेक लाडकी योजना’ सुरू करण्यात आली आहे.
– महाराष्ट्र शासनाने गरीब व आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या नागरिकांसाठी ही योजना सुरू केली आहे.
– लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षणापर्यंत सर्व खर्च हा महाराष्ट्र शासन उचलतो.
– या योजनेची पुढील उद्दिष्टे आपल्याला पाहवयास मिळेल :- l) सामाजिक दृष्टीने आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना बळकट करणे, ll) गरीब कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षण देणे किंवा शिक्षणाचा खर्च उचलणे, lll) राज्यातील निरक्षर मुलींना शिक्षण तसेच कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे, lV) मुलींच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे…. इत्यादी

 

८) नमो शेतकरी महा सन्मान योजना
– नमो शेतकरी सन्मान निधी योजना हि महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे.
– केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या’ धर्तीवर महाराष्ट्र शासनाने ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना’ मे 2023 मध्ये सुरू केली.
-️ या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 83 लाख शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून वर्षाला ₹ 6 हजार देण्यात येतील.
– ‘नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे’ उद्देश हे लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे, तसेच त्यांचे एकूण जीवनमान सुधारण्यासाठी आर्थिक मदत देणे होय.
– केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेतील सर्व पात्र शेतकरी या योजनेसाठी सुद्धा पात्र असतील.

 

९) एक रुपयात – पिक विमा योजना
– एका रुपयात ‘पिक विमा योजना’ राबवण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 23 जून 2023 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेतली.
– या पीक विमा योजनेचे प्रमुख उद्दिष्ट हे नैसर्गिक आपत्ती सारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे जे नुकसान होते, त्यामुळे त्या नुकसानी पासून शेतकऱ्यांचे विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी एक रुपयात ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ कृषी विभागा मार्फत राबविण्यात येते.
– या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट नैसर्गिक आपत्ती, पीक कीड आणि पीक रोगामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे होय.

 

१०) स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0
◆ सुरुवात : 30 सप्टेंबर 2022-23
– महाराष्ट्र राज्यातील शहरी भागातील विकासासाठी ही योजना महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागअंतर्गत राबविली जाते.
– या योजनेचा️ कालावधी हा 15 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 दरम्यानचा आहे.
– या योजनेची प्रमुख उद्दिष्टे हे समुद्रकिनारे, टेकड्या, पर्यटन स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिक तसेच प्रशासकीय वर्दळीची ठिकाणे सोबतच शहरातील महत्त्वाचे ठिकाणे स्वच्छ करणे, नदी स्वच्छता कार्यक्रम राबविणे इत्यादी.
– मोटो – कचरामुक्त शहरे

 

११) सलोखा योजना
-️ राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला 13 डिसेंम्बर 2022 रोजी मंजुरी देण्यात आली.
– या योजनेचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांचा शेत जमिनीच्या ताबा साठीचा वाद किंवा वहिवाटी बाबत शेतकऱ्यातील आपापसातील वाद मिटवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
– सलोखा योजनेमुळे शेतकऱ्यांचे शेतजमिनीच्या ताब्यावरुन होणारे वाद तसेच शेतकऱ्यांमध्ये असणारे आप आपसातील वाद/संघर्ष मिटवण्यासाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावते.

 

१२) महालक्ष्मी योजना (तेलंगणा राज्य)
◆ सुरुवात : 9 डिसेंबर 2023
– महालक्ष्मी योजना ही तेलंगणा राज्याने सुरू केलेली एक प्रमुख योजना आहे.
– या योजनेची उद्दिष्टे ही 18 वर्षावरील महिलांना आर्थिक सहायता देणे असून सोबतच या योजनेअंतर्गत महिला, मुली आणि ट्रान्सजेंडरना विनामूल्य बस प्रवास प्रदान करणे होय.
– या योजनेअंतर्गत तेलंगणा राज्यातील महिलांना दर महिन्याला ₹ 25000 हजार रुपये आर्थिक मदत देणे तसेच ₹ 500 गॅस सबसिडी देणे सोबतच मोफत बस सेवा देण्यात येते.

 

१३) जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना
◆ सुरुवात : ऑक्टोंबर 2023
– हि दिल्ली सरकारची एक महत्त्वाची योजना असून, या अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन देण्यात येते.
– या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, EWS मधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा कोचिंग आणि विविध प्रवेश परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येते.
– याशिवाय दर महिन्याला 2500 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.

 

१४) स्वच्छ त्योहार स्वस्थ त्योहार
◆️ सुरुवात : आक्टोंबर 2023
– हि योजना उत्तरप्रदेश राज्याची योजना असून, सण, उत्सव वेळी होणाऱ्या प्रदूषण रोखण्यासाठी राबविण्यात येते.
– या अभियाना अंतर्गत नवरात्र, दिवाळी, दसरा, होळी इत्यादी सण उत्सव साफ सफाई ची व्यवस्था राबविण्यासाठी आयोजीत करण्यात आली आहे.
– या अभियानाचा️ उद्देश हा स्वच्छता ही ईश्वर भक्तीच्या पेक्षा मोठी आहे या कल्पनेला चालना देण्यासाठी राबवली जाते आणि शासकीय संस्था आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाने ही स्वच्छता विषयक मोहीम सुरू करण्यात आली आहे.

 

१५) मुख्यमंत्री लाडली बहना आवास योजना
◆ सुरुवात : सप्टेंबर 2023
– ही योजना मध्य प्रदेश राज्याची एक महत्त्वाची योजना आहे.
– महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने ‘लाडली बहना आवास योजना’ सुरू केली आहे.
– या योजनेअंतर्गत, राज्यातील लाडक्या बहिणींना (महिलांना) कायमस्वरूपी घरे बांधण्यासाठी सरकारकडून 1,20,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

 

१६) मुख्यमंत्री श्रमिक कल्याण योजना
◆️ सुरुवात : 1 मे 2023
– मुख्यमंत्री श्रमिक कल्याण योजना हि अरुणाचल प्रदेश राज्याची योजना होय.
-️ राष्ट्रीय कामगार दिनी अरुणाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री पेमा खांडु यांनी या योजनेची घोषणा केली.
– अरुणाचल प्रदेश शासनाने त्या राज्यातील श्रमिक/कामगारांच्या कल्याणासाठी ही योजना सुरू केली आहे.
– या योजनेअंतर्गत नैसर्गिक मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येते, महिलांना मातृत्व लाभ मिळते, आकस्मिक अपघाती मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येते, अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत देण्यात येते, वैद्यकीय सहायता आणि अनेक लाभ या योजनेअंतर्गत देण्यात येते.

 

१७) लाडली बहना योजना
◆ सुरुवात : 15 मार्च 2023
– लाडली बहना योजना ही मध्यप्रदेश राज्याची एक प्रमुख योजना आहेत.
– या योजनेअंतर्गत मध्य प्रदेश राज्यातील महिला व बालकांचे आरोग्य, पोषण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी मदत करण्यात येते.
-️ या योजनेचे प्रमुख उद्देश मध्य प्रदेश राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Explore More

मुख्यमंत्री : कार्य आणि भूमिका

 मुख्यमंत्र्यांची कार्य आणि भूमिका  कुठलीही शासन पद्धती चालवण्याकरिता एक प्रमुख नेतृत्त्व असणे गरजेचे असते. ज्या प्रमाणे राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपती, पंतप्रधान असतात त्याच पद्धतीने राज्य स्तरावर मुख्यमंत्री, राज्यपाल असतात. या लेखात

समान नागरी संहिता

समान नागरी संहिता (Uniform Civil Code)   नुकताच चर्चेत असलेला समान नागरी कायदा काय आहेत? याबाबत विस्तृत चर्चा या लेखात करणार आहोत. समान नागरी संहिता हा राज्यशास्त्र (Polity) या विषयाशी

हंटर कमिशन

हंटर कमिशन   ब्रिटिशांच्या काळात किंवा ब्रिटिशांचे भारतात ज्यावेळी राज होते. त्यावेळी ब्रिटिशांनी राज्य सुरळीत चालावे याकरिता त्यांनी अनेक आयोगांची स्थापना केली व त्याची अंमलबजावणी सुद्धा केली. त्या आयोगानंपैकी एक