20 मे 2024 (चालू घडामोडी)

 

चालू घडामोडी (२० मे २०२४), राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय, खेळ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, भूगोल, अर्थव्यवस्था, पर्यटन, प्रकल्प, महत्त्वाचे दिन, दिनविशेष, महत्त्वाची व्यक्ती, पुरस्कार, पुस्तके, प्रसिद्ध व्यक्ती, इत्यादी घटकावर आधारीत महत्त्वाच्या चालू घडामोडी, chalu ghadamodi, current affairs in marathi, weekly current affairs, monthly current affairs in marathi, marathi chalu ghadamodi, may month current affairs, sunil chhetri retirement from international football, which country unveiled high-speed 6G prototype gadget, Malti Joshi writter passed away, New Caledonia emergency, World Aquatics build highest swimming pool in bhutan, operation maryada in kedarnath dham Yatra etc. Imp current affairs, आगामी परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मुद्दे विश्लेषण करून चालू घडामोडी, चालु घडमोडी, सर्व स्पर्धा परीक्षा करिता उपयुक्त अशा महत्त्वाच्या चालू घडामोडी, सर्व प्रश्न महत्त्वाचे असून, यातील प्रत्येक मुद्दे हे विश्लेषण करून महत्त्वाचे आहे.

 

20 मे 2024 चालू घडामोडी

प्रश्न १) नुकतेच कोणत्या भारतीय फुटबॉल खेडाळूने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
उत्तर : सुनील छेत्री
🔷 सुनील छेत्री (Sunil Chhetri) हा भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार असून, त्याने नुकतीच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ६ जून २०२४ रोजी कोलकाता येथे होणारा फिफा विश्वचषक (FIFA World Cup) पात्रता सामना हा सुनीलचा आपल्या संघासाठीचा शेवटचा सामना असेल. हा सामना कुवेत विरुद्ध आहे.
– गोल-स्कोअरिंग मशीन (The Goal-Scoring Machine) म्हणून सुनील छेत्रीला ओळखल्या जाते. त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. SAFF चॅम्पियनशिप (२०११, २०१५, २०२१) आणि नेहरू चषक (२००७, २००९, २०१२) इत्यादी खेळात त्याने भारताला विजय मिळवून देण्यासाठी मोठी भूमिका बजावली आहे. २००८ मध्ये भारताला AFC चॅलेंज कप जिंकण्यासाठी त्याचा मोठा वाटा होता, आणि हि भारताने पहिली AFC आशियाई कप जिंकली होती. २००२ मध्ये छेत्रिने फुटबॉल स्पर्धेत पदार्पण केले होते, तेव्हा पासून अनेक गोल करून तो सर्वकालीन यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण १५० आंतरराष्ट्रीय सामन्यात ९४ गोल करून पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय गोल-स्कोअरर म्हणून तिसऱ्या क्रमांकावर तो येतो.

 

प्रश्न २) जगातील पहिले 6G प्रोटोटाइप उपकरण कोणत्या देशाने सादर केले आहे?
उत्तर : जपान
🔷 जपानच्या कन्सोर्टियमने नुकतेच जगातील पहिल्या हाय-स्पीड 6G प्रोटोटाइप (high-speed 6G prototype) उपकरणाचे अनावरण केले असून, हे गॅझेट / उपकरण DOCOMO, NEC, NTT आणि Fujitsu यांच्या व्दारे विकसीत करण्यात आले आहे. हे उपकरण 5G पेक्षा २० पटीने जास्त वेगवान आहे. हे गॅझेट ३०० फुटांवर 100 Gbps वेगाने डेटा प्रसारित करू शकते. याची यशस्वीरित्या चाचणी घरामध्ये तसेच बाहेर मोकळ्या जागेत करण्यात आली. सध्यातरी 6G विकसीत नसून ती विकासाच्या टप्प्यात आहे. त्यामुळे हि प्रणाली व्यावसायिक वापरासाठी तयार नाही. त्याची गती प्रभावी असूनही, नेटवर्क तंत्रज्ञानामध्ये सद्या कमतरता आढळून येत आहेत.

 

प्रश्न ३) नुकतेच मालती जोशी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले असून, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? chalu ghadamodi
उत्तर : साहित्य
🔷 मालती जोशी (Malti Joshi) यांचे कर्करोगाशी लढा देऊन निधन झाले असून, त्या साहित्य विश्वातील प्रतिष्ठित व्यक्ती आहे. त्यांना २०१८ मध्ये त्यांच्या साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल भारताचा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी लेखिका आणि कथाकार म्हणून हिंदी आणि मराठी साहित्यावर एक अमिट छाप सोडली.
– मालती जोशी यांनी हिंदी आणि मराठी साहित्यात पन्नासहून अधिक कथासंग्रहाचे लेखन करून, या क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले. जोशी यांनी ६० पेक्षा अधिक पुस्तके लिहली आहेत. जोशी यांचे साहित्य भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात अभ्यासले जातात.

 

 

प्रश्न ४) नुकतेच न्यू कॅलेडोनियाच्या ‘पॅसिफिक बेटांवर’ कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केली आहे?
उत्तर : फ्रान्स
🔷 न्यू कॅलेडोनियाच्या (New Caledonia) पॅसिफिक बेटांवर हिंसक दंगलीत चार लोकांचा बळी गेला आणि शेकडो लोक अटक करण्यात आल्यानंतर फ्रान्सने न्यू कॅलेडोनियामध्ये आणीबाणी जाहीर केली. या आणीबाणीत अधिकाऱ्यांना, नेत्यांना मेळावे घेण्यासाठी बंदी घालण्यात आली आणि लोकांना बेटा शेजारी फिरण्यास मनाई करण्यात आली. हि आणीबाणी पॅरिसमधील खासदारांनी नवीन विधेयक स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी दंगली सुरू झाल्या, त्यामुळे लागू करण्यात आली. हे नवीन विधेयक न्यू कॅलेडोनियामधील फ्रेंच रहिवाशांना प्रांतिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी अधिकार देत होते, तेथील स्थानिक नेत्यांना भीती होती, की त्यांचे स्थानिक कनक (Kanak) मत कमी होईल. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी याचा विरोध करत दंगली घडवून आणल्या. current affairs in marathi
🔶 फ्रान्स (France) : राजधानी – पॅरिस , अधिकृत भाषा – फ्रेंच , चलन – युरो , राष्ट्राध्यक्ष – इमॅन्युएल मॅक्राँ ,
पंतप्रधान – गेब्रीएल ॲटल

 

प्रश्न ५) नुकतेच कोणत्या देशात वर्ल्ड एक्वाटिक्सने जगातील सर्वोच्च स्पर्धात्मक जलतरण तलाव उघडला आहे?
उत्तर – भूतान
🔷 थिम्पू, भूतान मध्ये वर्ल्ड एक्वाटिक्स (World Aquatics) आणि भूतान एक्वाटिक्स फेडरेशनने भूतान मध्ये होणाऱ्या पहिल्या जलतरण स्पर्धेच्या निमित्ताने जगातील पहिले सर्वात उंच जलतरण तलावाचे उद्घाटन केले आहे. हे जलतरण तलाव ८२०० फूट उंचीवर असून, यात सर्व सुविधा उपलब्ध आहे. याचे काम २०१९ मध्ये सुरू करण्यात आले होते, जागतीक स्तरावर जलतरण किंवा स्विमिंग खेळांना चालना देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
🔶 भूतान (Bhutan) : राजधानी – थिंपु , अधिकृत भाषा – झोंगखा , चलन – भूतानी डुलत्रुम आणि भारतीय रुपया , राजा – जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक , पंतप्रधान – शेरिंग तोबगे

 

 

प्रश्न ६) नुकतेच केदारनाथ धाम यात्रा 2024 सुरळीत पार पाडण्यासाठी उत्तराखंड पोलिसांनी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? चालू घडामोडी
उत्तर – ऑपरेशन मर्यादा
🔷 उत्तराखंड पोलिसांनी केदारनाथ येथे आयोजित चार धाम यात्रेत भाविकांना गर्दीच्या वेळी सुव्यवस्था प्रदान करण्यासाठी रुद्रप्रयाग जिल्हा पोलिसांनी “ऑपरेशन मरयादा” (Operation Maryada) नावाने ऑपरेशन सुरू केले. यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांना शांततापूर्वक दर्शन घेण्यासाठी मदत करणे, तसेच गर्दीच्या वेळी होणारे गैरवर्तन आणि मादक पदार्थांचे सेवन इत्यादी घटनेवर लक्ष्य केंद्रित करणे हे या ऑपरेशनचे उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Explore More

चालू घडामोडी (08 मे 2024)

08 मे 2024 (चालू घडामोडी)     ०८ मे २०२४ रोजीच्या महत्वपूर्ण चालू घडामोडी, यात राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय, खेळ, राजकीय, भौगोलिक, इतिहास, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, भूगोल, अर्थव्यवस्था, महत्त्वाच्या व्यक्ती,

महाराष्ट्र भूषण पुरस्कार

महाराष्ट्र भूषण पुरस्कार या लेखात आपण महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार असून, नुकताच 30 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023

चालू घडामोडी (१० एप्रिल २०२४)

चालू घडामोडी (Current affairs)  10 एप्रिल 2024 चालू घडामोडी   चालू घडामोडी हा स्पर्धा परीक्षा दृष्टीकोनातून महत्त्वाचा भाग आहे. दररोज चालू घडामोडी महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी १० एप्रिल २०२४ रोजीच्या