17 मे 2024 (चालू घडामोडी)

 

 

चालू घडामोडी (१७ मे २०२४), राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय, खेळ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, भूगोल, अर्थव्यवस्था, पर्यटन, प्रकल्प, महत्त्वाचे दिन, दिनविशेष, महत्त्वाची व्यक्ती, पुरस्कार, पुस्तके, प्रसिद्ध व्यक्ती, इत्यादी घटकावर आधारीत महत्त्वाच्या चालू घडामोडी, chalu ghadamodi, current affairs in marathi, weekly current affairs, monthly current affairs in marathi, marathi chalu ghadamodi, may month current affairs, international football day, International day of family, IndiaSkills 2024, skill competition, hero motocorp auto company ondc network, global excellence award 2024, NASA plan to first lunar railway system in moon etc. Imp current affairs, आगामी परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मुद्दे विश्लेषण करून चालू घडामोडी, चालु घडमोडी, सर्व स्पर्धा परीक्षा करिता उपयुक्त अशा महत्त्वाच्या चालू घडामोडी, सर्व प्रश्न महत्त्वाचे असून, यातील प्रत्येक मुद्दे हे विश्लेषण करून महत्त्वाचे आहे.

 

 

१७ मे २०२४ चालू घडामोडी

प्रश्न १) नुकतेच संयुक्त राष्ट्र संघाने कोणता दिवस जागतिक फुटबॉल दिवस म्हणून घोषित केला आहे?
उत्तर – २५ मे
🔷 नुकताच ७ मे २०२४ रोजी, संयुक्त राष्ट्र संघाच्या (United Nations) जनरल असेंब्लीने दरवर्षी २५ मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिवस (International Football Day) म्हणून घोषीत केला आहे. लिबियाचे राजदूत ताहेर एल-सोनी (Taher El-Sonni) यांनी हा ठराव मांडला होता. त्यांच्या या ठरावाला १६० हून अधिक सदस्य राष्ट्रांनी समर्थन केले.
🔶 संयुक्त राष्ट्र संघटना (United Nations) : स्थापना – २४ ऑक्टोंबर १९४५ , मुख्यालय – न्यू यॉर्क, अमेरिका , सदस्य देश – १९३ , अधिकृत भाषा – अरबी, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश , सरचिटणीस – एंटोनियो गुटेरेश (पोर्तुगाल) , जनरल असेंब्ली अध्यक्ष – डेनिस फ्रॅन्सिस (स्वित्झर्लंड)

 

प्रश्न २) नुकताच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – १५ मे
🔷 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस (International Day Of Family) : आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन दरवर्षी १५ मे ला साजरा केला जातो. हा एक जागतिक दिवस असून, जगभरातील कुटुंबांच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघटनेने या दिवसाची स्थापना हि जगभरातील समाजात कुटुंबांची (Family) महत्त्वपूर्ण भूमिका आपल्या आयुष्यात काय असते, याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आणि याला भेडसावणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्याविषयक समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी या दिवसाची स्थापना करण्यात आली. ज्यावेळी संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) जगभरातील कुटुंबांची विकसित होणारी रचना आणि त्यांना येणाऱ्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केले, त्यानंतर त्यांनी या दिवसाची स्थापना करण्यासाठी प्रयत्न केले. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जनरल असेंब्लीने १९८९ हे वर्ष कुटुंबाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले होते. सामान्यतः १९९३ मध्ये आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवसाची स्थापना करण्यात आली. Chalu ghadamodi
🔶 संयुक्त राष्ट्र संघटना (United Nations) : स्थापना – २४ ऑक्टोंबर १९४५ , मुख्यालय – न्यू यॉर्क, अमेरिका , सदस्य देश – १९३ , अधिकृत भाषा – अरबी, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश , सरचिटणीस – एंटोनियो गुटेरेश (पोर्तुगाल) , जनरल असेंब्ली अध्यक्ष – डेनिस फ्रॅन्सिस (स्वित्झर्लंड)

 

प्रश्न ३) अलीकडेच दुचाकी उद्योगात क्रांती आणण्यासाठी ONDC नेटवर्कमध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे?
उत्तर – हीरो मोटो
🔷 नुकतीच हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) हि ऑटो कंपनी ONDC नेटवर्कमध्ये सामील झाली असून, या नेटवर्कमध्ये सामील होणारी ती देशातील पहिली ऑटो कंपनी ठरली आहे. चालू घडामोडी
– ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (Open Network For Digital Commerce) (ONDC) : डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक नेटवर्कवर वस्तू आणि सेवांच्या (Goods and Services) देवाणघेवाण करण्यासाठीचा हा एक उपक्रम असून, ज्याचा उद्देश देवाणघेवाणीच्या सर्व पैलूंसाठी खुल्या नेटवर्कला (open networks) प्रोत्साहन देणे आहे. ONDC स्थापन करण्यामागचा उद्देश हा ओपन स्पेसिफिकेशन्स आणि ओपन नेटवर्क प्रोटोकॉल वापरून कोणत्याही विशिष्ट प्लॅटफॉर्मपेक्षा स्वतंत्रपणे ओपन सोर्स पद्धतीवर आधारित आहे. ONDC मध्ये वस्तू आणि सेवांच्या देवाणघेवाणीच्या क्रियेमध्ये ओपन प्रोटोकॉल, इंटरनेटवरील माहितीची देवाणघेवाण, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, ईमेलची देवाणघेवाण, साधा मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि पेमेंटसाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस इत्यादी नेटवर्क मध्ये सुविधा विकसित करणे हा उद्देश आहे.

 

प्रश्न ४) नुकतेच कोणत्या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा IndiaSkills 2024 चे उद्घाटन करण्यात आले आहे?
उत्तर – नवी दिल्ली
🔷 नुकतेच यशोभूमी, द्वारका, नवी दिल्ली या ठिकाणी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने (MSDE) देशातील सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा IndiaSkills 2024 चे उद्घाटन समारंभाचे आयोजन केले होते. यात भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून कौशल्य प्राप्त ९०० पेक्षा अधिक विद्यार्थी आणि ४०० पेक्षा जास्त उद्योग समूहातील तज्ञ व्यक्तींचा समावेश होता. चार दिवसीय या कौशल्य स्पर्धेत (IndiaSkills) सहभागी विद्यार्थी आणि उद्योग तज्ञमंडळीना त्यांची वैविध्यपूर्ण कौशल्ये आणि प्रतिभा राष्ट्रीय व्यासपीठावर दाखविण्याची संधी मिळते. यात सहभागींना अनेक प्रकारची जवळपास ६१ कौशल्ये, ज्यात पारंपारिक हस्तकलेपासून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत अशी विविध कौशल्ये दाखवता येतील. ६१ कौशल्यांपैकी ४७ कौशल्य स्पर्धा ऑनसाइट (onsight) आयोजित करण्यात आल्या, तर उर्वरित स्पर्धा सर्वोत्तम पायाभूत सुविधा लक्षात घेऊन १४ कौशल्य स्पर्धा ऑफसाइट आयोजीत करण्यात आले. यात गुजरात, कर्नाटक, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्ये आयोजित केल्या जातील.
या स्पर्धेत सहभागी विद्यार्थी हे इतर ९ प्रदर्शन कौशल्यांमध्ये देखील सहभागी होतील ज्यात लेदर-शूमेकिंग (Leather-Shoemaking) , ड्रोन-फिल्मिंग मेकिंग (Drone-Filming making) , टेक्सटाईल-विव्हिंग (Textile-Weaving) , आणि प्रोस्थेटिक्स-मेकअप (prosthetics-makeup) यासारख्या कौशल्यांचा समावेश असेल. या राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेत सहभागी होणारे विद्यार्थी हे देशभरातील आयटीआय, एनएसटीआय, पॉलिटेक्निक, इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग , इंस्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग, आणि इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये इत्यादी इंस्टिट्यूट मधून प्रशिक्षित आहे. या स्पर्धेत होणारे विजेते, सप्टेंबर २०२४ मध्ये ल्योन, फ्रान्स (lyon, France) येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेची (ज्यात ७० हून अधिक देश सहभागी होणार आहेत) तयारी देशातील सर्वोत्कृष्ट उद्योग प्रशिक्षकांच्या मदतीने करतील.

 

प्रश्न ५) नुकताच ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड कोणी जिंकला आहे?
उत्तर – चंद्रकांत सतीजा
🔷 नुकतेच चंद्रकांत सतीजा (Chandrakant Satija) यांना ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड 2024 (Global Excellence Award 2024) ने सन्मानित करण्यात आले आहे. चंद्रकांत सतीजा हे प्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि चंद्रा ॲडमिशन कन्सल्टंट्सचे संस्थापक/सीईओ (Chandra Admission Consultants – CEO) आहेत. हा पुरस्कार प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या हस्ते सतिजा यांना प्रदान करण्यात आला. त्यांना शैक्षणिक क्षेत्रात २१ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. चंद्रकांत सतीजा यांनी शैक्षणीक क्षेत्रात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, करिअर समुपदेशन आणि शैक्षणिक प्रवेश मार्गदर्शन इत्यादी बाबतीत त्यांनी कार्य केले आहेत. सतिजा याने विदर्भातच नव्हे, तर छत्तीसगड आणि मध्यप्रदेश आसपासच्या शहरांमध्येही त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले आहेत.

 

प्रश्न ६) अलीकडेच कोणत्या संघटनेने चंद्रावर पहिली रेल्वे यंत्रणा उभारण्याची योजना उघड केली आहे?
उत्तर – नासा
🔷 नुकतेच नासाने (NASA) चंद्रावर पहिली चंद्र रेल्वे प्रणाली (first lunar railway system) तयार करण्याची योजना आखली आहे. हि प्रणाली चंद्रावर पेलोड वाहतुकीत क्रांती घडवून आणण्यासाठी डिझाइन करण्यात आली असून, ही प्रणाली FLOAT (फ्लेक्झिबल लेव्हिटेशन ऑन अ ट्रॅक) म्हणून ओळखली जाते.
🔶 नासा (National Aeronautics and Space Administration) (NASA) : स्थापना – २९ जुलै १९५८ , मुख्यालय – वॉशिंग्टन डीसी, अमेरिका , प्रशासक – बिल नेल्सन , नासा हि युनायटेड स्टेट्स फेडरल सरकारची अंतराळ संस्था आहे जी एरोनॉटिक्स संशोधन करत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Explore More

चालू घडामोडी (07 मे 2024)

07 मे 2024 (चालू घडामोडी)   ०७ मे २०२४ रोजीच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी, ज्यात राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, भूगोल, इतिहास, खेळ, महत्त्वाचे दिवस, दिनविशेष, महत्त्वाची व्यक्ती, प्रसिद्ध

महाराष्ट्र भूषण पुरस्कार

महाराष्ट्र भूषण पुरस्कार या लेखात आपण महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार असून, नुकताच 30 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023

चालू घडामोडी (18 मे 2024)

18 मे 2024 (चालू घडामोडी)   चालू घडामोडी (१८ मे २०२४), राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय, खेळ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, भूगोल, अर्थव्यवस्था, पर्यटन, प्रकल्प, महत्त्वाचे दिन, दिनविशेष, महत्त्वाची व्यक्ती, पुरस्कार,