10 मे 2024 (चालू घडामोडी)

 

चालू घडामोडी (१० मे २०२४), राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय, खेळ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, भूगोल, अर्थव्यवस्था, पर्यटन, प्रकल्प, महत्त्वाचे दिन, दिनविशेष, महत्त्वाची व्यक्ती, पुरस्कार, पुस्तके, प्रसिद्ध व्यक्ती, इत्यादी घटकावर आधारीत महत्त्वाच्या चालू घडामोडी, chalu ghadamodi, current affairs in marathi, weekly current affairs, monthly current affairs in marathi, marathi chalu ghadamodi, may month current affairs, russia Tactical nuclear weapons exercise, bhutan and India joint meeting, Indian Navy, Indian Air force joint venture, basketball federation of India, Yuzvendra Chahal highest wickets taker, Bambi Bucket, red cross day, etc. Imp current affairs, आगामी परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मुद्दे विश्लेषण करून चालू घडामोडी, चालु घडमोडी, सर्व स्पर्धा परीक्षा करिता उपयुक्त अशा महत्त्वाच्या चालू घडामोडी, सर्व प्रश्न महत्त्वाचे असून, यातील प्रत्येक मुद्दे हे विश्लेषण करून महत्त्वाचे आहे.

 

 

प्रश्न १) अलीकडे कोणत्या देशाने तणावाच्या काळात सामरिक अण्वस्त्रांच्या सरावाची घोषणा केली आहे?
उत्तर – रशिया
🔷 नुकतेच रशियाने सामरिक अण्वस्त्रांच्या (Tactical nuclear weapons) वापरासाठी लष्करी सराव आयोजित करण्याची घोषणा केली. हा सराव पाश्चात्य देशातील अधिकाऱ्यांकडून प्रक्षोभक धमक्या दिल्यानंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने करायचे ठरवले. या सरावाचे आदेश रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी दिले होते. भविष्यातील गैर-सामरिक युद्ध मोहिमेसाठी सज्ज राहण्यासाठी आण्विक सैन्याच्या तयारीची चाचणी करणे हे या सरावाचे उद्देश होते.
– युद्धभूमीवर वापरण्यासाठी सामरिक अण्वस्त्रांमध्ये (Tactical nuclear weapons) हवाई बॉम्ब (air bombs), कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसाठी / मिसाईल वॉरहेड्स ( warheads) आणि तोफखाना शस्त्रे (artillery munitions) यांचा समावेश असते. मोठ्या वॉरहेड्सपेक्षा ते कमी सामर्थ्यवान असतात, सोबतच संपूर्ण शहरे नष्ट करण्याची क्षमता सुद्धा या शस्त्रात असते.
🔷 रशिया (Russia) : राजधानी – मॉस्को, चलन – रशियन रुबल, अधिकृत भाषा – रशियन, राष्ट्रप्रमुख – व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin)

 

प्रश्न – २) अलीकडेच लेहमध्ये भारत आणि कोणत्या देशादरम्यान पाचवी संयुक्त सीमाशुल्क गटाची बैठक झाली?
उत्तर – भूतान
🔷 ६-७ मे २०२४ दरम्यान भारत आणि भूतान यांच्यात ५वी जॉइंट ग्रुप ऑफ कस्टम्स (JGC) बैठक लेह, लडाख येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे सहअध्यक्ष म्हणून भारत सरकारच्या सीमाशुल्क विभागाचे विशेष सचिव आणि सदस्य श्री. सुरजित भुजाबळ (Mr. Surjit Bhujabal), हे होते, तर भूतानच्या महसूल आणि सीमाशुल्क विभागाचे महासंचालक श्री सोनम जामत्शो (Mr. Sonam Jamtsho), यांच्या दरम्यान बैठक घेण्यात आली.
– या बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली – दोन्ही देशातील नवीन जमीनवर सीमाशुल्क विभागांचे स्टेशन उघडणे, नवीन व्यापार मार्ग सूचित करणे, पायाभूत सुविधांचा विकास करणे , ऑटोमेशन ( automation and digitisation) प्रक्रियेचे डिजिटायझेशन करणे, तस्करी थांबवणे, क्रॉस-बॉर्डर वर सहव्यवस्थापन करणे, सीमाशुल्क डेटा सुरक्षित करणे, दोन्ही देशातील सीमाशुल्क सहकार्यावरील करार आणि वाहतूक मालवाहतूक याला इलेक्ट्रॉनिक कार्गो प्रणाली अंतर्गत जोडणे इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
🔷 भूतान (Bhutan) : राजधानी – थिंपू , चलन – भूतानी ङुलत्रुम (BTN) , अधिकृत भाषा –
जोंगखा, इंग्लिश

 

प्रश्न ३) अलीकडेच भारतीय लष्कर आणि हवाई दलाने कुठे संयुक्त सराव केला आहे?
उत्तर – पंजाब
🔷 नुकतेच पंजाबमध्ये भारतीय सैन्याच्या खरगा कॉर्प्स (Kharga Corps) आणि भारतीय हवाई दल (Indian Air Force) यांच्यात लष्कराच्या वेस्टर्न कमांडच्या (Army’s Western Command) नेतृत्वाखाली तीन दिवसीय संयुक्त सराव आयोजीत करण्यात आला होता. ऑपरेशनल सज्जता वाढवणे आणि विकसित भागात हेलिकॉप्टरच्या यांत्रिक ऑपरेशन्समध्ये हल्लाचे प्रमाणीकरण करणे हा या सरावाचा उद्देश आहे. गगन स्ट्राइक-II असे या सरावाचे नाव असून, यात अनआर्म्ड एरियल व्हेइकल्स (UAV), अपाचे (Apache), ALH-WSI हेलिकॉप्टर आणि भारतीय सैन्याच्या विशेष युनिट्ससह विविध शस्त्रचा सहभाग करण्यात आला होता. चालू घडामोडी,

 

प्रश्न ४) अलीकडेच स्कॉट फ्लेमिंग यांची कोणत्या देशाच्या पुरुष बास्केटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – भारत
🔷 बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाने (BFI), अलिकडेच भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाचे (Indian men’s basketball team) नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून स्कॉट फ्लेमिंग (Scott Flemming) यांची नियुक्ती केली आहे. २०१२-२०१५ मध्ये सुद्धा फ्लेमिंगने भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कामगिरी बजावली होती, हा त्यांचा दुसरा कार्यकाळ/टप्पा होय. फ्लेमिंगने २०१४ मध्ये वुहान येथे झालेल्या FIBA ​​आशिया कप 2014 (FIBA Asia Cup 2014) च्या स्पर्धेत भारतीय संघाला चीनच्या संघावर जबरदस्त विजय मिळवून दिला होता. त्यावेळी चीन हा आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचा बास्केटबॉल संघ होता. फ्लेमिंगच्या प्रशिक्षणाखाली भारताने दोनदा दक्षिण आशियाई बास्केटबॉल चॅम्पियनशिप आणि लुसोफोनिया गेम्स (Lusofonia Games 2014) या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

 

प्रश्न ५) अलीकडे नैनितालच्या जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी हवाई दलाने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे?
उत्तर – बांबी बकेट
🔷 नुकतेच भारतीय वायुसेनेने (Indian Air Force), बांबी बकेटने (Bambi Bucket) सुसज्ज असलेल्या Mi-17 V5 हेलिकॉप्टरचा वापर करत नैनितालजवळील जंगलाला लागलेली आग विझवण्यासाठी मदत केली. १९८३ मध्ये बांबी बकेट कॅनडाच्या डॉन आर्नीने शोधली होती. डॉन आर्नीने हेलिकॉप्टरच्या खाली मोठ्या प्रमाणात पाणी वाहून नेण्यासाठी एखाद्या मोठ्या बॅगेचा वापर केला, आणि त्या व्दारे हवेतून वणव्याची आग विझवण्याचे काम जलद, कार्यक्षम आणि सोपे झाले. या त्यांच्या शोधामुळे हवाई अग्निशमन कार्यात क्रांती घडून आली. Current affairs in marathi

 

 

प्रश्न ६) अलीकडेच T20 मध्ये 350 विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे?
उत्तर – युझवेंद्र चहल
🔷 सध्या चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा लेग-स्पिनर युझवेंद्र चहल Yuzvendra Chahal) याने क्रिकेटच्या टी-२० / लहान फॉरमॅटमध्ये ३५० बळी / विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
चालू घडामोडी, chalu ghadamodi

 

 

प्रश्न ७) जागतिक रेडक्रॉस दिन कधी साजरा करण्यात येतो?
उत्तर – ८ मे
🔷 जागतिक रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट दिवस (World Red Cross Day) : दरवर्षी ८ मे रोजी, जागतिक रेड क्रॉस दिवस साजरा करण्यात येतो. रेड क्रॉस आणि रेड क्रॉसची आंतरराष्ट्रीय समिती (International Committee of the Red Cross) (ICRC) यांचे संस्थापक हेन्री ड्युनंट (Henry Dunant) यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. हेन्री ड्युनंट यांचा जन्म ८ मे १८२८ रोजी, जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे झाला. त्यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे आणि ते हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले होते. ड्युनंट यांच्या जन्मदिनी आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस आणि रेड क्रिसेंट चळवळीची तत्त्वे साजरी करण्यात येते. जागतिक रेडक्रॉस दिवस हा रेड क्रिसेंट दिवस (Red Crescent Day) म्हणूनही ओळखला जातो. रेड क्रॉस चलवळ हि जगभरातील अनेक देशात असलेल्या अन्नाचा तुटवडा दूर करणे, साथीच्या आजारांमुळे त्रस्त असलेल्या लोकांसाठी मदत करणे, अनेक नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत पुरवणे आणि देशा देशातील युद्ध परिस्थीत सापडलेल्या लोकांना मदतीचा हात पुरवणे इत्यादी कामे हि संस्था करत असते. सोबतच ज्या लोकांना खरोखरच मदतीची गरज आहे, अशा लोकांना मूलभूत सुविधाही हि संस्था पुरवत असते. अनेक सरकारी आणि खाजगी संस्था रेड क्रॉसचे सक्रिय सदस्य बनून अनेक आपत्तींनी ग्रासलेल्या गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे येतात.
– जागतिक रेडक्रॉस दिन २०२४ ची थीम _ “I give with joy, and the joy I give is a reward” अशी आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Explore More

चालू घडामोडी (04 मे 2024)

चालू घडामोडी (04 मे 2024) प्रश्न १) पुढील ५ वर्षांकरिता भारत कोणत्या देशातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देईल? उत्तर – बांगलादेश 🔷 भारत सरकारने २०२५ – २०३० या पाच वर्षाच्या कालावधीकरिता

चालू घडामोडी (20 मे 2024)

20 मे 2024 (चालू घडामोडी)   चालू घडामोडी (२० मे २०२४), राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय, खेळ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, भूगोल, अर्थव्यवस्था, पर्यटन, प्रकल्प, महत्त्वाचे दिन, दिनविशेष, महत्त्वाची व्यक्ती, पुरस्कार,

चालू घडामोडी (18 मे 2024)

18 मे 2024 (चालू घडामोडी)   चालू घडामोडी (१८ मे २०२४), राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय, खेळ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, भूगोल, अर्थव्यवस्था, पर्यटन, प्रकल्प, महत्त्वाचे दिन, दिनविशेष, महत्त्वाची व्यक्ती, पुरस्कार,