07 मे 2024 (चालू घडामोडी)

 

०७ मे २०२४ रोजीच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी, ज्यात राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, भूगोल, इतिहास, खेळ, महत्त्वाचे दिवस, दिनविशेष, महत्त्वाची व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती, विविध संघटना, संस्था, विविध रिपोर्ट, इत्यादी घटकांवर आधारित महत्त्वाच्या चालू घडामोडी, current affairs in marathi, weekly current affairs, monthly current affairs, marathi chalu ghadamodi, chalu ghadamodi may month, इत्यादी महत्त्वाच्या बाबी आगामी परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.

 

प्रश्न १) जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो?
उत्तर – मे महिन्याच्या पहिल्या रविवारी
🔷 जागतीक हास्य दिवस (World Laughter Day) दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा करण्यात येतो. या वर्षीचा (२०२४) जागतीक हास्य दिन ५ मे रोजी साजरा करण्यात आला. डॉ. मदन कटारिया (भारतीय चिकित्सक आणि हास्य योग चळवळीचे संस्थापक) यांनी सन १९९८ मध्ये जागतिक हास्य दिनाची स्थापना केली होती. डॉ. कटारिया यांनी हसण्यामुळे होणारे उपचारात्मक फायदे लक्षात घेता हसण्याच्या क्षमतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि समाजातील सांस्कृतिक तसेच भौगोलिक फरक लक्षात न घेता हास्याच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने या दिवसाची स्थापना केली.
– जागतिक हास्य दिनाचा उद्देश हास्यामुळे तणाव कमी होणे, चिडचिडेपणा दूर करणे, चिंता कमी करण्यासाठी, मूड सुधारणे इत्यादी गोष्टींपासून हास्यामुळे फायदा होतो. सोबतच समाजात कनेक्शनची भावना वाढविण्यासाठी हास्याची मदत होते.

 

प्रश्न २) अलीकडेच कोणत्या देशाने अधिकृतपणे भारतीय योग पद्धतीचा स्वीकार केला आहे?
उत्तर – पाकिस्तान
🔷 नुकतेच पाकिस्तानने भारतीय योग पद्धतीचा स्वीकार केला आहे. जागतीक योग दिवसाची स्थापना करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्र संघात (United Nations) मसुदा ठराव प्रस्तावित केला होता. ११ डिसेंबर २०१४ ला १७५ सदस्य राष्ट्रांनी मान्यता दिल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day) म्हणून घोषित केला.

 

प्रश्न ३) नुकतेच भ्रष्टाचारामुळे डेव्हन थॉमस या खेळाडूवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे, तो कोणत्या देशाचा खेळाडू होय ?
उत्तर – वेस्ट इंडिज
🔷 आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (The International Cricket Council) (ICC), डेव्हॉन थॉमस या वेस्ट इंडिजच्या खेळाडूने अनेक भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचे कबुल केल्यानंतर त्याला ICC ने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये पाच वर्षांची बंदी घालून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली. थॉमसने अमिराती क्रिकेट बोर्ड (ECB), श्रीलंका क्रिकेट (SLC), आणि कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) यासह इतर सात बोर्डच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याचे मान्य केले.
🔷 आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (The International Cricket Council) : हि क्रिकेट खेळासाठीची जागतीक प्रशासकिय संस्था आहे. याची स्थापना १५ जून १९०९ ला करण्यात आली. स्थापनेवेळी याचे नाव इम्पीरियल क्रिकेट कॉन्फरन्स होते. सध्या याचे मुख्यालय दुबई, संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी आहे. याचे सदस्य देश १०८ आहे. सध्या याचे अध्यक्ष म्हणून ग्रेग बार्कले काम पाहतात.

 

प्रश्न ४) बर्नार्ड हिल यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते कोण होते?
उत्तर – अभिनेता
🔷 बर्नार्ड हिल (Bernald Hill) : ब्रिटीश अभिनेते बर्नार्ड हिल चालू घडामोडी, current affairs in marathi, weekly current affairs, monthly current affairs, यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी टायटॅनिक, गांधी, दि लॉर्ड ऑफ दि रिंग्ज इत्यादी सिनेमात काम केले.

 

प्रश्न ५) नुकतेच कोणते विद्यापीठ हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ ठरले आहे?
उत्तर – चंदीगड विद्यापीठ
🔷 चंदीगड विद्यापीठाने अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाशी सामंजस्य करार (MoU) केला आहे. या करारा अंतर्गत सहयोगी व्यवसाय व्यवस्थापन कार्यक्रम (collaborative business management program) सुरू करण्यात आला असून, यात इच्छुक व्यावसायिक विद्यार्थ्यांना हार्वर्ड विद्यापीठात जो अभ्यासक्रम आहे तो इथे सुद्धा शिकविल्या जाईल. असा करार करणारे चंदीगड विद्यापीठ हे पहिले भारतीय विद्यापीठ ठरले आहे.

 

प्रश्न ६) नुकतीच जम्मू आणि काश्मीरसाठी ग्रॅपलिंग कमिटीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
उत्तर – सानिया कादरी
🔷 ग्रॅपलिंग (Grappling) हे लढाईचे तंत्र आहे (खेळाचा प्रकार). यात ग्राउंड फायटिंग, क्लिंच फायटिंग , स्वीप करणे, थ्रो करणे , ट्रिप, आणि जमिनीवर सबमिशन होल्ड करणे इत्यादी प्रकार येतात.
– नुकतीच सानिया काद्री यांची जम्मू आणि काश्मीर राज्यातील कुरघोडी करणाऱ्या (Grappling) क्रीडा समुदायाच्या महत्त्वपूर्ण विकासासाठी, सुभम चौधरी (चेअरमन – उत्तर भारत) ग्रॅपलिंग कमिटी ऑफ इंडिया यांच्या शिफारसीनुसार जम्मू काश्मीर प्रदेशासाठी ग्रॅपलिंग कमिटीच्या अध्यक्षपदी काद्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त अध्यक्ष काद्रि यांच्याकडे जम्मू आणि काश्मीरमधील ग्रॅपलिंग स्पोर्ट्सच्या ऑपरेशन्सवर देखरेख ठेवणे आणि या खेळाच्या विकासासाठी सल्ला देणे इत्यादी जबाबदाऱ्या त्यांच्याकडे असेल. काद्री यांच्या नियुक्तीचा उद्देश हा या प्रदेशातील ग्रॅपलिंग खेळांच्या विकासासाठी नवीन दृष्टीकोन तयार करणे आणि खेळाच्या विकासासाठी धोरणात्मक मार्गदर्शन करणे हे आहे.

 

प्रश्न ७) अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या शाश्वत विकास ध्येयाचे स्थानिकीकरण: भारतातील स्थानिक प्रशासनातील महिला आघाडीवर असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे?
उत्तर – न्यूयॉर्क
🔷 युनायटेड नेशन्समधील (United Nations) संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (UNFPA) आणि भारत सरकारचे कायमस्वरूपी मिशन आणि पंचायती राज मंत्रालय, यांच्या सहकार्याने, ३ मे २०२४ रोजी “SDGs (Sustainable development goals) चे स्थानिकीकरण: भारतातील स्थानिक प्रशासनातील महिला आघाडी” या विषया कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय, न्यू यॉर्क याठिकाणी आयोजीत करण्यात आले. हा कार्यक्रम २९ एप्रिल ते ०३ मे २०२४ दरम्यान आयोजीत केला आहे. या कार्यक्रमाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेल्या श्रीमती. सुप्रिया दास दत्त, श्रीमती. कुनुकू हेमा कुमारी, श्रीमती. नीरू यादव, या महिला प्रतिनिधींची निवड करण्यात आली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व श्री. विवेक भारद्वाज (सचिव) पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडे सोपवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Explore More

चालू घडामोडी (20 मे 2024)

20 मे 2024 (चालू घडामोडी)   चालू घडामोडी (२० मे २०२४), राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय, खेळ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, भूगोल, अर्थव्यवस्था, पर्यटन, प्रकल्प, महत्त्वाचे दिन, दिनविशेष, महत्त्वाची व्यक्ती, पुरस्कार,

चालू घडामोडी (10 मे 2024)

10 मे 2024 (चालू घडामोडी)   चालू घडामोडी (१० मे २०२४), राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय, खेळ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, भूगोल, अर्थव्यवस्था, पर्यटन, प्रकल्प, महत्त्वाचे दिन, दिनविशेष, महत्त्वाची व्यक्ती, पुरस्कार,

चालू घडामोडी (17 मे 2024)

17 मे 2024 (चालू घडामोडी)     चालू घडामोडी (१७ मे २०२४), राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय, खेळ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, भूगोल, अर्थव्यवस्था, पर्यटन, प्रकल्प, महत्त्वाचे दिन, दिनविशेष, महत्त्वाची व्यक्ती,