चालू घडामोडी (03 मे 2024)

 

चालू घडामोडी (०३ मे २०२४) आगामी सर्व स्पर्धा परीक्षेकरिता उपयुक्त. महत्त्वाच्या सर्व चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे तसेच विश्लेषण. Current affairs in marathi, चालू घडामोडी, मे २०२४ चालू घडामोडी, देश, विदेश, आंतरराष्ट्रीय घटना, बातम्या, करेंट अफेअर्स, घडामोडी, परीक्षा महत्त्वाचे प्रश्न. सर्व स्पर्धा परीक्षा करिता महत्त्वाच्या चालू घडामोडी व महत्त्वाचे मुद्दे…..

 

 

प्रश्न १) अलीकडेच कोणत्या देशाने दीर्घकाळ चालणाऱ्या चलन संकटाला तोंड देण्यासाठी नवीन चलन सुरू केले आहे?

उत्तर – झिम्बाब्वे

🔶 झिम्बाब्वे (Zimbabwe) या देशात दीर्घकाळापासून चलन संकट चालू होते, या चलन संकटाला तोंड देण्यासाठी झिम्बाब्वेने नवीन चलन सुरू केले. या चलनाचे नाव ZiG (Zimbabwe Gold) असे आहे. हे चलन एप्रिल महिन्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर करण्यात आले होते. आणि आता ते बँक नोट आणि नाण्याच्या स्वरूपात सादर करण्यात आले.

🔶 Republic of Zimbabwe : राजधानी – हरारे, अधिकृत भाषा – इंग्लिश, जुनं चलन – झिम्बाब्वेन डॉलर,

राष्ट्राध्यक्ष – एमर्सन म्नान्गाग्वा

 

प्रश्न २) अलीकडेच कोणत्या एडटेक कंपनीने टाईमच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे?

उत्तर – एमेरिटस

🔶 टाइम (Time) आणि Statista ने जगभरातील २५० एडटेक (EdTech) कंपन्यांची रँकिंग सूचित केली आहे. ही रँकिंग ऑनलाईन शिक्षण, आर्थिक ताकद आणि उद्योग प्रभावाचे मूल्यमापन करून प्रसिद्ध करण्यात येते. या यादीत एमेरिटस (Emeritus) या EdTech कंपनीने प्रथम स्थान पटकावले आहे, याचे मुख्यालय सिंगापूर येथे आहे. मेम्रिसे (Memrise) ही ब्रिटेनची एडटेक कंपनी असून याने दुसरे स्थान पटकावले, तर ब्राझील मधील Afya ने तिसरा नंबर लावला. भारतातील मिको (Miko) या कंपनीचा यादीत २६ वा नंबर लागतो.

 

प्रश्न ३) कोणत्या देशाने अलीकडे ट्रक आणि अवजड वाहनांच्या आयातीवरील बंदी उठवली आहे?

उत्तर – श्रीलंका

🔶 २०२० पासून आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेने देशाच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने ट्रक आणि अवजड वाहनांच्या आयातीला परवानगी दिली आहे.

🔶 श्रीलंका (Sri Lanka) : राजधानी – कोलंबो, श्री जयवर्धनपुर कोट्टे , अधिकृत भाषा – सिंहली, तमिळ , चलन – श्रीलंकी रुपया,

राष्ट्रपती – रानिल विक्रमसिंघे , पंतप्रधान – दिनेश गुणवर्धने

 

प्रश्न ४) नुकताच रुआंग ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशात झाला आहे?

उत्तर – इंडोनेशिया

🔶 इंडोनेशियातील रुआंग (Ruang) ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. Ruang ज्वालामुखी हे इंडोनेशियातील सर्वात दक्षिणेकडील सांगिहे बेटावर ४ बाय ५ किलोमिटर पसरलेला पाहवयास मिळतो. याची समुद्रसपाटीपासून उंची ७२५ मीटर इतकी आहे.

 

प्रश्न ५) आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा करण्यात येतो?

उत्तर – १ मे

🔶 दरवर्षी १ मे रोजी, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय कामगार दिवस (International Workers’ Day / Labour Day / May Day) यालाच मे दिवस म्हणून सुद्धा संबोधल्या जाते. हा दिवस १ मे किंवा मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी साजरा करण्यात येतो. कामगार आणि कामगार वर्गाचा हा एक महत्त्वपूर्ण उत्सव आहे ज्याला आंतरराष्ट्रीय कामगार चळवळी व्दारे प्रोत्साहन दिल्या जाते. सर्वात प्रथम हा दिवस १ मे १८८९ ला साजरा करण्यात आला होता.

 

प्रश्न ६) १ मे रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात येतो?

उत्तर – गुजरात आणि महाराष्ट्र

🔶 १ मे १९६० रोजी मुंबई प्रांताच्या विभाजनातून महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची स्थापना ही भाषिक सीमेवरून करण्यात आली. राज्य पुनर्रचना कायदा (१९५६) द्वारे भाषेच्या आधारे महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची स्थापना करण्यात आली. मराठी आणि कोकणी भाषा बोलल्या जाणाऱ्या क्षेत्राला महाराष्ट्र म्हणून स्थापन करण्यात आले, तर गुजरात राज्याची स्थापना ही गुजराती आणि कच्छी भाषेच्या आधारे करण्यात आले.

 

प्रश्न ७) नुकतेच कोणत्या देशाने एशियन कॅरम चॅम्पियनशिपमध्ये पुरुष आणि महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे?

उत्तर – भारत

🔶 मालदीव मधील माले या ठिकाणी सुरू असलेल्या सहाव्या आशियाई कॅरम स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी महिला आणि पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावले आहे. भारताच्या के श्रीनिवासन आणि मोहमद गुफ्रान यांनी पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात मालदीवच्या हसन नसीम आणि इस्माईल आझमीन यांचा पराभव केला. आकांक्षा कदम आणि शैनी सेबॅस्टियन या भारतीय खेळाडूंनी महिला दुहेरीत नागजोठी आणि रश्मी कुमारी यांचा अंतिम सामन्यात पराभव केला.

 

प्रश्न ८) अलीकडेच चीनने कोणत्या देशासाठी तयार केलेली पहिली 8थ हँगर क्लास पाणबुडी लाँच केली आहे?

उत्तर – पाकिस्तान

🔶 चीनने आठ हँगोर श्रेणीची पाणबुडी (8th Hangor Class Submarine) नुकतीच लाँच केली आहे. चीनने या पाणबुडीच्या श्रेणीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ही युद्धनौका पाकिस्तानला देण्यात आली असून, याचा वापर दोन्ही देशाच्या द्विपक्षीय लष्कराला सहकार्याच्या उद्दीष्टेने लाँच करण्यात आले आहे.

 

प्रश्न ९) अलीकडे उत्तराखंड सरकारने पतंजली आयुर्वेदाच्या किती उत्पादनांचा उत्पादन परवाना निलंबित केला आहे?

उत्तर – 14

🔶 उत्तराखंड सरकारने पतंजली दिव्या फार्मसी आणि आयुर्वेद लिमिटेड या कंपनी द्वारे उत्पादित केलेल्या एकूण १४ उत्पादनांचे परवाने त्वरित निलंबित करण्यात आले आहे. राज्य परवाना प्राधिकरणाने वारंवार सांगून सुध्दा बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने औषध जाहिराती कायद्याचे (Drug advertisement law) (Drugs and Magic Remedies (Objectionable Advertisements) Act, 1954) उल्लंघन केल्याप्रकरणी हा आदेश जारी केला गेला.

 

प्रश्न १०) विनय वीर यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

उत्तर – पत्रकारीता

🔶 विनय वीर यांचे २७ एप्रिल २०२४ रोजी, वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले आहे. ते एक पत्रकार होते. विनय वीर यांनी १९९१ नंतर दैनिक हिंदी मिलाप मध्ये संपादक म्हणून सुद्धा भूमिका बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Explore More

चालू घडामोडी (08 मे 2024)

08 मे 2024 (चालू घडामोडी)     ०८ मे २०२४ रोजीच्या महत्वपूर्ण चालू घडामोडी, यात राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय, खेळ, राजकीय, भौगोलिक, इतिहास, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, भूगोल, अर्थव्यवस्था, महत्त्वाच्या व्यक्ती,

चालू घडामोडी (26 एप्रिल 2024)

26 एप्रिल 2024 चालू घडामोडी   प्रश्न १) नुकताच राष्ट्रीय पंचायती राज दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 24 एप्रिल ◾ पंचायती राज दिवस हा भारतातील पंचायती राज व्यवस्थेचा

चालू घडामोडी (04 मे 2024)

चालू घडामोडी (04 मे 2024) प्रश्न १) पुढील ५ वर्षांकरिता भारत कोणत्या देशातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देईल? उत्तर – बांगलादेश 🔷 भारत सरकारने २०२५ – २०३० या पाच वर्षाच्या कालावधीकरिता