08 मे 2024 (चालू घडामोडी)
०८ मे २०२४ रोजीच्या महत्वपूर्ण चालू घडामोडी, यात राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय, खेळ, राजकीय, भौगोलिक, इतिहास, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, भूगोल, अर्थव्यवस्था, महत्त्वाच्या व्यक्ती, पुरस्कार, इत्यादी घटकावर आधारीत महत्त्वाच्या चालू घडामोडी, current affairs in marathi, chalu ghadamodi, सर्व प्रकारच्या चालू घडामोडी आगामी सर्व परीक्षांना उपयुक्त ठरतील. सर्व प्रश्न महत्त्वाचे असून, आगामी सर्व स्पर्धा परीक्षा करिता उपयुक्त आहे. चालू घडामोडी, current affairs, monthly current affairs, weekly current affairs, marathi current affairs, chalu ghadamodi, may month current affairs, chalu ghadamodi may, imp gk, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी
प्रश्न १) भारतीय बनावटीचे पहिले स्वदेशी बॉम्बर UAV नुकतेच कोठे लाँच करण्यात आले आहे?
उत्तर – बेंगळुरू
🔷 नुकतेच फ्लाइंग वेज डिफेन्सने (Flying Wedge Defence) हि भारतातील संरक्षण आणि एरोस्पेस तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीने भारतीय बनावटीचे पहिले स्वदेशी बॉम्बर UAV एअरक्राफ्ट – FWD-200B विकसित केले आहे. भारताचा इतर देशाकडून होणारा महागड्या बॉम्बर मानवरहित विमानांचा आयातीवरील भार कमी करण्याचा आणि मेक इन इंडिया या उपक्रमाला चालना देण्याच्या उद्देशाने कंपनीने हे पाऊल उचलले आहे. सोबतच कंपनीने भारताला हवाई संरक्षण संसाधनाने सुसज्ज करणे, जागतिक ड्रोन उत्पादनात अग्रेसर करणे, राष्ट्रीय सुरक्षा वाढवणे आणि जागतीक तंत्रज्ञान केंद्र म्हणून स्थान देणे हे उद्दिष्ट ठेवले आहे.
– FWD-200B एअरक्राफ्टची पेलोड क्षमता ही सुमारे १०० किलो असून, ती मानवरहित लढाऊ हवाई वाहन आहे, जी मध्यम उंची, दीर्घ सहनशक्ती याप्रकारे वर्गीकृत आहे. मानवरहित हवाई प्रणालीत (Unmanned Aerial System) ऑप्टिकल पाळत ठेवणारे पेलोड असते, जे की अचूक हवाई हल्ल्यांसाठी उपयुक्त असतात. याचा कमाल वेग हा 200 kts/370 kmph असून, ते १२-२० तासापर्यंत उपयोगी पडतात.
प्रश्न २) अलीकडेच पुरातत्वशास्त्रज्ञांना ७००० वर्ष जुनी प्रागैतिहासिक वसाहत कुठे सापडली आहे?
उत्तर – सर्बिया
🔷 अलीकडेच पुरातत्वशास्त्रज्ञांनी सात हजार वर्षे जुनी पूर्व-ऐतिहासिक वसाहत शोधली आहे. ही वसाहत ईशान्य सर्बियातील तामिस नदीजवळ आढळली. हि वसाहत निओलिथिक (Neolithic) कालखंडातील असल्याचे मानले जात आहे. सापडलेली वसाहत सुमारे ११ ते १३ हेक्टरमध्ये पसरलेली असून, ४ ते ६ खंदकांनी वेढलेली आहे.
– संशोधकांनी या वसाहतीची व्याप्ती नकाशावर उतरवण्यासाठी भूभौतिक पद्धतींचा वापर केला आहे. या पद्धतीच्या वापरामुळे संशोधकांना आग्नेय-मध्य युरोपमध्ये स्थित असलेल्या मोठ्या वसाहती स्थापन करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या विन्का संस्कृतीशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी उपयोग होईल. सर्बियन बनात प्रदेशात सुद्धा काही मोठ्या जून्या निओलिथिक वसाहती आढळल्यामुळे हा शोध महत्त्वपूर्ण ठरतो. जार्कोव्हॅक गावाजवळ असलेली प्रागैतिहासिक वसाहत प्रादेशिक बनात संस्कृतीचा प्रभाव दर्शिवते, ज्यामुळे या प्रदेशातील प्रागैतिहासिक समाजांची माहिती शोधण्यासाठी मदत होईल.
प्रश्न ३) अलीकडे कोणत्या देशाने थॉमस आणि उबेर कप बॅडमिंटनचे विजेतेपद जिंकले आहे?
उत्तर – चीन
🔷 नुकतेच ५ मे २०२४ रोजी, चीनच्या चेंगडू शहरात आयोजीत 2024 BWF थॉमस चषक (Tomas Cup) आणि उबेर चषक (Uber Cup) चा अंतिम सामना खेळला गेला. यात चिनच्या बॅडमिंटन संघाने पुरुष टॉमस चषक (Tomas Cup) आणि महिला उबेर चषक (Uber Cup) दोन्ही जिंकून या खेळातील आपले वर्चस्व कायम ठेवले. दर दोन वर्षांनी जागतिक बॅडमिंटन नियामक मंडळ, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (Badminton World Federation – BWF) द्वारे थॉमस चषक आणि उबेर चषक आयोजित केला जातो. थॉमस चषक आणि उबेर चषक या दोन्ही स्पर्धांमध्ये दोन दुहेरी आणि तीन एकेरी अशाप्रकारे सामने खेळले जात असते. परंतू, जर एखाद्या संघाने पहिले दोन एकेरी सामने आणि नंतर पहिले दुहेरी सामने जिंकले, तर इतर सामने नंतर खेळले जात नाहीत.
🔷 थॉमस चषक (Thomas Cup) : ह्या चषकाला जागतिक पुरुष बॅडमिंटन संघ चॅम्पियनशिप (World Men’s Badminton Team Championship) म्हणूनही ओळखल्या जाते. या चषकाचे (Thomas Cup) नाव आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन फेडरेशनचे (BWF) संस्थापक सर जॉर्ज थॉमस (Sir George Thomas) यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ज्याप्रमाणे टेनिस मध्ये पुरुषांच्या टेनिस डेव्हिस चषक असते, त्याचप्रमाणे बॅडमिंटनमध्येही पुरुषांची सांघिक स्पर्धा असावी, असा प्रस्ताव थॉमस यांनी मांडला. १९४८-४९ मध्ये पहिली थॉमस चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पहिल्या स्पर्धेचे विजेतेपद मलेशियाने अंतिम फेरीत डेन्मार्कचा पराभव करून जिंकले होते. आजपर्यंत फक्त ६ देशांनी थॉमस कप जिंकला असून, इंडोनेशियाने या स्पर्धेत सर्वात जास्त वेळा विजेतेपद पटकावले आहे, इंडोनेशियाने एकूण १५ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. तर चीनने ११ वेळा, मलेशियाने ५ वेळा आणि जपान आणि भारताने प्रत्येकी एकदा हि स्पर्धा जिंकली आहे. भारताने २०२२ मध्ये हि स्पर्धा जिंकली होती.
🔷 उबेर चषक (Uber Cup) : महिला बॅडमिंटन टीम चॅम्पियनशिप (The Women’s Badminton Team Championship) ही उबेर चषक (Uber Cup) म्हणूनही प्रसिद्ध आहे. बेट्टी उबेर (Betty Uber) ही इंग्लंडची महान बॅडमिंटनपटू होती तीने या ट्रॉफीची रचना केली होती आणि हि ट्रॉफी तीने डोनेट / दान केली होती. तिच्याच नावावरून या ट्रॉफीला नाव देण्यात आले आहे. थॉमस कप प्रमाणे हि स्पर्धा सुद्धा दर दोन वर्षांनी आयोजित केल्या जाते. सन १९८४ पासून, उबेर चषक आणि थॉमस चषक एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी आयोजित केले जात आहे. १९५६ – ५७ मध्ये पहिला उबेर चषक आयोजित करण्यात आला होता आणि तो यूएसए (USA) संघाने जिंकला होता. या स्पर्धेत सुद्धा चीनचा संघ सर्वात यशस्वी संघ ठरला आहे, चीनने आतापर्यंत १६ वेळा हि स्पर्धा जिंकली आहे. तर जपानने हे चषक ६ वेळा जिंकले आहे. परंतू, भारतीय महिला संघाने एकदाही उबेर कप जिंकलेला नाही