चालू घडामोडी (04 मे 2024)

प्रश्न १) पुढील ५ वर्षांकरिता भारत कोणत्या देशातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देईल?
उत्तर – बांगलादेश
🔷 भारत सरकारने २०२५ – २०३० या पाच वर्षाच्या कालावधीकरिता बांगलादेशातील १५०० प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार (Memorandum of Understanding (MoU)) केला आहे. भारत सरकारचे प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (DARPG) आणि बांगलादेशच्या लोक प्रशासन मंत्रालय यांच्यात हा करार झाला आहे. २०१४ मध्ये बांगलादेशच्या लोक प्रशासन मंत्रालय आणि भारत सरकारच्या नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स (NCGG) यांच्यात बांगलादेशातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी एक सामंजस्य करार करण्यात आला होता. त्याच कराराचे वेळोवेळी नूतनीकरण करण्यात येत असून, नवीनतम करार नूतनीकरणाद्वारे आणखी पाच वर्षांसाठी (२०३० पर्यंत) वाढवला गेला.

प्रश्न २) नुकताच जागतिक टूना दिवस कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – २ मे
🔷 टूना हा एक उबदार रक्ताचा म्हणजेच एंडोथर्मिक (Endothermic) मासा आहे (एंडोथर्मिक म्हणजे असा प्राणी जो स्वतःच्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकतो आणि बर्फाळ / थंड पाण्याशी जुळवून घेउ शकतो ) . टूना एक मोठा समुद्री प्राणी असून, तो जगभरातील अनेक समुद्रांमध्ये आढळतो. ट्यूनाच्या २४ पेक्षा अधिक जाती आढळतात. टूना हा आकाराने मोठा असतो, त्याची लांबी ८ फूटापर्यंत पोहोचू शकते, तर त्याचे वजन ५०० ​​पौंडांपेक्षा जास्त वाढू शकते. जागतिक टूना दिवस (World Tuna Day) दरवर्षी २ मे रोजी साजरा करण्यात येतो. अतिमासेमारी मुळे ट्यूनाची प्रजाती हि लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी, टूनाचे महत्त्व सांगण्यासाठी आणि शाश्वत मासेमारी पद्धतींना प्रोत्साहन मिळवून देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. टूना दिवस युनायटेड नेशन्स (United Nations) द्वारे आयोजित करण्यात येतो. सर्वप्रथम जागतीक टूना दिवस २ मे २०१७ रोजी साजरा करण्यात आला होता.

प्रश्न ३) नुकतेच कोणत्या देशात संशोधकांना जगातील सर्वात खोल ब्लू होल सापडला आहे?
उत्तर – मेक्सिको
🔷 निळे छिद्रे (Blue hole) ही समुद्रात अशी उभी गुहा असते, जी पूर्णपणे पाण्याने भरलेली असते. ब्ल्यू होल हे सिंकहोल (Sinkhole) असतात जे किनारपट्टीच्या प्रदेशातील विरघळणाऱ्या दगळांचा बिछाना असते. उदा. संगमरवरी, चुनखडी, किंवा जिप्सम इत्यादी. जेव्हा किनारपट्टीच्या प्रदेशातील पृष्ठभागावरील पाणी खडकांमधून झिरपून, खनिजे विरघळून त्या खडकातील क्रॅक / छिद्रे रुंद करतात तेव्हा ब्लू होल तयार होतात. ब्लू होल / निळ्या छिद्रांमध्ये सामान्यत: ताजे सागरी / मिश्र रसायनिक पाणी असते.
या ब्लू होलचे नाव ‘ताम जा’ ब्लू होल (TJBH) आहे, जे मेक्सिको मधील युकाटन द्वीपकल्पातील (Yucatan Peninsula) चेतुमल खाडीमध्ये (Chetumal Bay) आहे. TJBH होलची समुद्रसपाटीपासूनची लांबी खाली कमीत कमी १३८० फूट (४२० मीटर) आत आहे. या आधी सर्वात खोल असलेले ब्लू होल दक्षिण चीन समुद्रात होते ज्याची खोली ३९० फूट खोल आहे. याला सनशा योंगल ब्लू होल (Sansha Yongle) किंवा यालाच ड्रॅगन होल म्हणून देखील ओळखले जाते.

प्रश्न ४) नुकतेच कोणत्या देशाच्या सुरक्षा दलांनी भारतासोबत नवी दिल्लीत संयुक्त सुरक्षा सराव केला आहे?
उत्तर – इस्रायल
🔷 भारतात असलेल्या इस्रायलच्या दूतावासाने नुकतेच भारतीय सुरक्षा दलांच्या (Indian security forces) भागीदारीत, नवी दिल्ली या ठिकाणी एक व्यापक संयुक्त सुरक्षा कवायत (joint security drill) आयोजित केली होती. भविष्यातील संभाव्य धोक्यांचा प्रभावीपणे आणि तत्परतेने सामना करणे, दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांच्या तत्परतेचे मूल्यमापन करणे आणि ते वाढवणे हे या सरावाचे / ऑपरेशनचे (Exercise) उद्दिष्ट आहे.

प्रश्न ५) पॉल ऑस्टरचे नुकतेच निधन झाले ते कोण होते?
उत्तर – लेखक
🔷 पॉल ऑस्टर (Paul Auster) हे अमेरिका या देशातील असून, त्यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी न्यूयॉर्क ट्रायलॉजीसह (The New York trilogy) ३४ पुस्तकांचे लेखन केले आहे.

प्रश्न ६) कोणत्या देशाला जागतिक बँकेकडून ८४ दशलक्ष डॉलर्सची मानवतावादी मदत मिळाली आहे?
उत्तर – अफगाणिस्तान
🔷 जागतीक बँकेने (World Bank) अफगाणिस्तान या देशाला ८४ दशलक्ष डॉलरची मानवतावादी मदत केली आहे. आर्थिक स्थैर्य निर्माण करणे, महिलांना पाठिंबा देणे आणि हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी, तसेच अफगाणिस्थान देशात चालू असलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी ही मदत केली आहे . सोबतच असुरक्षित गटांना मदत, उपजीविका प्रकल्पांना समर्थन, स्थलांतरितांच्या पुनर्वसनासाठी मदत करणे आणि ग्रामीण, शहरी सामुदायिक सेवा आणि संस्था वाढवणे हे या निधीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
जागतीक बँक (World Bank) : स्थापना – ७ जुलै १९४४, मुख्यालय – वॉशिंग्टन डिसी, USA, अध्यक्ष – अजय बांगा

प्रश्न ७) भारतीय लष्कर आणि पुनित बालन ग्रुपने अलीकडेच पहिले संविधान उद्यान कोठे बांधले आहे?
उत्तर – पुणे

प्रश्न ८) ४६ वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठकीचे यजमान कोणता देश करेल?
उत्तर – भारत
🔷 अंटार्क्टिका करार हा १९५९ ला झाला, आणि १९६१ मध्ये लागू करण्यात आला. या कराराचा उद्देश हा अंटार्क्टिका खंडाला वैज्ञानिक सहयोग मिळवून देणे, त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करणे, आणि पर्यावरण संरक्षणाखाली समर्पित क्षेत्र आणणे आहे. या कराराला ५६ हून अधिक देशांनी मान्यता दिली असून त्याच्या तत्त्वांसाठी आणि वाढीसाठी जागतिक समर्थन दर्शवित आहे. भारत देश हा ४६ वी अंटार्क्टिका करार सल्लागार बैठकीचे (46th Antarctic Treaty Consultative Meeting) यजमान / होस्ट आणि समितीची २६ वी बैठक सुद्धा आयोजीत करणार आहे. ही बैठक केरळमधील कोची या ठिकाणी २० मे ते ३० मे २०२४ दरम्यान आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीत अंटार्क्टिका परिसंस्थेचे रक्षण कशाप्रकारे करता येईल आणि या क्षेत्रात वैज्ञानिक शोधांना कशाप्रकारे पुढे नेता येईल या विषयी चर्चा करण्यात येईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Explore More

चालू घडामोडी (१० एप्रिल २०२४)

चालू घडामोडी (Current affairs)  10 एप्रिल 2024 चालू घडामोडी   चालू घडामोडी हा स्पर्धा परीक्षा दृष्टीकोनातून महत्त्वाचा भाग आहे. दररोज चालू घडामोडी महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी १० एप्रिल २०२४ रोजीच्या

चालू घडामोडी (17 मे 2024)

17 मे 2024 (चालू घडामोडी)     चालू घडामोडी (१७ मे २०२४), राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय, खेळ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, भूगोल, अर्थव्यवस्था, पर्यटन, प्रकल्प, महत्त्वाचे दिन, दिनविशेष, महत्त्वाची व्यक्ती,

चालू घडामोडी (06 मे 2024)

चालू घडामोडी (06 मे 2024)   ०६ मे २०२४ रोजीच्या, महत्वपूर्ण चालू घडामोडी ज्यात राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय, खेळ, महत्त्वाच्या संस्था, सरकारी योजना, राजकीय, सामाजिक, इत्यादी घटकावर आधारित तसेच परीक्षेला