Site icon MPSC Point

११ एप्रिल २०२४ (चालू घडामोडी)

चालू घडामोडी (Current affairs)
11 एप्रिल 2024 चालू घडामोडी

आगामी सर्व स्पर्धा परीक्षा करिता उपयुक्त चालू घडामोडी. सर्व महत्त्वपूर्ण चालू घडामोडी देश,विदेश, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी. चालू घडामोडी हा स्पर्धा परीक्षा दृष्टीकोनातून महत्त्वाचा भाग आहे. दररोज चालू घडामोडी महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी ११ एप्रिल २०२४ रोजीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण पाहणार आहोत. एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, रेल्वे भरती, एसएससी भरती, साठी चालू घडामोडी महत्त्वाच्या आहेत. Current affairs in marathi, important current affairs, marathi current affairs, chalu ghadamodi

 

प्रश्न १) नुकताच CRPF शौर्य दिवस कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – ९ एप्रिल
🔷 ९ एप्रिल १९६५ ला गुजरात मधील २ बटालियन केरीपुबलच्या एका लहान तुकडीने रण ऑफ कच्छ मध्ये असलेल्या सरदार पोस्टवर पाकिस्तानी ब्रिगेड व्दारे केलेल्या हल्ला मोडून काढला होता. या हल्ल्यात या लहान तुकडीने ३४ पाकिस्तानी सैनिकांना मृत्यूची वाट दाखवली तर ४ जणांना जीवंत पकडले. या संघर्षात केरीपुबलचे ६ बहादुर जवान शहीद झाले. या बहादुर शहीद वीरांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी ९ एप्रिल रोजी शौर्य दिवस साजरा करण्यात येतो.

 

प्रश्न २) IPEF द्वारे नुकतेच क्लीन एनर्जी इन्व्हेस्टर फोरम कोणत्या देशात आयोजित केले जाईल?
उत्तर – सिंगापूर
🔷 Indo Pacific Economic Framework for Prosperity (IPEF) द्वारे नुकतेच क्लीन एनर्जी इंवेस्टर फोरम सिंगापूर येथे आयोजित करण्यात आले. IPEF ची सुरुवात मे २०२२ ला करण्यात आली असून, यात १४ देशांचा समावेश होतो. यात आपल्याला ऑस्ट्रेलिया,फिजी,भारत, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, दक्षिण कोरिया इत्यादी देश पाहवयास मिळतात. IPEF सदस्य देशांना लवचिक, शाश्वत विकासासाठी, आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाच्या वाढीसाठी सहकार्य करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते.

 

प्रश्न ३) नुकतेच कोणत्या शहरात राष्ट्रीय महिला हॉकी लीगचे उद्घाटन होणार आहे?
उत्तर – रांची
🔷 राष्ट्रीय महिला हॉकी लीग भारतातील महिलांसाठी पहिली डोमेस्टिक लीग होय. जी महिला खेडाळूना प्रतिभा आणि कौशल्य प्रदान करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करते.

 

प्रश्न ४) वित्त आयोगाचे सदस्य म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – मनोज पांडा
🔷 नुकतेच केंद्राने मनोज पांडा यांची १६ व्या वित्त आयोगाच्या कायम सदस्य म्हणून निवड केली आहे. या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी अरविंद पनगढीया आहे. मनोज पांडा हे एक अर्थशास्त्राज्ञ असून त्यांचा कार्यकाल हा रिपोर्ट जमा करण्यापर्यंत किंवा ३१ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत असेल. १६ व्या वित्त आयोगात ४ सदस्य आहेत.

 

प्रश्न ५) भारताने अलीकडेच कोणत्या देशात सिटवे बंदरावर ऑपरेशनल नियंत्रण मिळवले आहे?
उत्तर – म्यानमार
🔷 सिटवे बंदर (Sittwe Port) हे एक खोलपाण्यातील बंदर असून, भारताने २०१६ मध्ये या बंदराची निर्मिती केली आहे. भारताने जरी हे बंदर बांधले असेल तरी हे बंदर म्यानमार मधील रखायने प्रांतात आहेत. या प्रकल्पाचा उद्देश हा म्यानमार आणि भारत या देशातील दळणवळण विकास मजबूत करणे होय.

प्रश्न ६) कोणत्या देशाने अलीकडे रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात केले आहे?
उत्तर – चीन
🔷 रशिया : राजधानी – मॉस्को, भाषा – रशियन, चलन – रुबल
🔷 चीन : राजधानी – बिजिंग, भाषा – चायनीज, चलन – रेनमीनबी

 

प्रश्न ७) अलीकडे कोणत्या देशाचे सैन्य माउंट एव्हरेस्टवरून कचरा गोळा करण्याची मोहीम सुरू करणार आहे?उत्तर – नेपाळ 🔷 नेपाळ : राजधानी – काठमांडू, भाषा – नेपाळी, चलन – नेपाळी रुपी, राष्ट्रपती – राम चंद्र पौडेल, पंतप्रधान – पुष्प कमल दहल

माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर असून, त्याची उंची ही ८,८४८ मीटर इतकी आहे. माउंट एव्हरेस्ट हिमालय पर्वतावर आहेत.

 

प्रश्न ८) ECI ने अलीकडे कोणते नवीन ॲप लाँच केले आहे?
उत्तर – सुविधा पोर्टल
🔷 भारतीय निवडणूक आयोग (Election commission of India) : स्थापना – २५ जानेवारी १९५०, मुख्य निवडणूक आयुक्त – राजीव कुमार
निवडणूक आयोगाने आगामी निवडणुका स्वतंत्र, निष्पक्ष, आणि पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी सुविधा पोर्टल विकसित केले आहे.

Exit mobile version