महाराष्ट्र भूषण पुरस्कार
या लेखात आपण महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार असून, नुकताच 30 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 साठी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्काराची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा पुरस्कार असून यावर आधारित परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार : महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र राज्याचा सर्वात मोठा पुरस्कार आहे. हा पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल देण्यात येतो. या पुरस्कारावर आधारित परीक्षेत प्रश्न विचारले जातात त्यामुळे या पुरस्काराचे स्वरूप, निकष, कोणत्या क्षेत्रात दिला जातो, आता पर्यंत कोणा कोणाला देण्यात आले आहे, या सर्व गोष्टी आपण या लेखात जाणून घेणार आहोत. राज्यसेवा, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक, इत्यादी परीक्षा करिता उपयुक्त.
■ महाराष्ट्र भूषण पुरस्कार : महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च / सर्वात मोठा नागरी पुरस्कार आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या विशेष योगदानाबद्दल प्रदान करण्यात येतो. हा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येत असून, या पुरस्काराची सुरुवात 1995 ला करण्यात आली होती. याचा प्रस्ताव 1995 मध्ये शिवसेना – भाजप युती असताना करण्यात आले होते. सर्व प्रथम 1996 मध्ये हा पुरस्कार पु.ल.देशपांडे यांना त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला होता.
◆ क्षेत्र : महाराष्ट्र भूषण पुरस्कार विविध क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या त्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल देण्यात येतो. सुरुवातीला हा पुरस्कार कला, क्रिडा, साहित्य आणि विज्ञान या क्षेत्रात दिला जायचा, नंतर यात सामाजिक कार्य, उद्योग, पत्रकारिता, सार्वजनिक प्रशासन, आरोग्य सेवा या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला. सध्या हा पुरस्कार कला, क्रिडा, साहित्य, विज्ञान, उद्योग, लोकप्रशासन, सामाजिक सेवा, समाज सेवा, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या विशेष कार्याबद्दल दरवर्षी देण्यात येतो.
◆ स्वरूप : सुरुवातीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करतेवेळी 5 लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र दिले जात होते. त्यांनतर या पुरस्काराच्या स्वरूपात 2012 मध्ये बद्दल करून 5 लाख रुपयां ऐवजी 10 लाख रुपये रोख दिले जात. सद्या पुरस्कार विजेत्या व्यक्तीला 25 लाख रुपये रोख, शाल, सन्मानचिन्ह, आणि प्रशस्तीपत्र दिले जाते.
◆ निकष : महाराष्ट्र भूषण पुरस्कार पात्रतेसाठी काही निकष ठेवण्यात आले आहे.
० पुरस्कार प्राप्त करणारा व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला हवा.
० पुरस्कार प्राप्त करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या क्षेत्रात कमीत कमी 20 वर्षे अखंड सेवा केलेली असावी.
० पुरस्कारासाठी पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण प्राप्त व्यक्तींना / विजेत्यांना प्राधान्य दिले जाते.
० एखाद्या खेडाळूला अनेक पुरस्कार मिळाले असतील.
० नवा शोध लागला गेला असेल.
इत्यादी निकष पाहायला मिळतात, परंतु सप्टेंबर 2012 मध्ये या पुरस्काराच्या निकषांमध्ये काही बद्दल करण्यात आले, आधी हा पुरस्कार महाराष्ट्र रहिवासी असलेल्या व्यक्तीला दिला जात असे परंतु नन्तर त्यात बद्दल करून हा पुरस्कार परप्रांतीयांना सुध्दा दिला जातो. परंतु त्या परप्रांतीय व्यक्तीने महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्यास असणे आवश्यक आहे.
◆ पुरस्कार विजेते : खालील तक्त्यात आतापर्यंत महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्या व्यक्तींची यादी दिलेली आहे.
वर्ष – नाव – क्षेत्र
1996 – पु.ल.देशपांडे – साहित्य
1997 – लता मंगेशकर – संगीत,कला
1999 – विजय भटकर – विज्ञान
2000 – सुनील गावस्कर – क्रीडा
2001 – सचिन तेंडुलकर – क्रिडा
2002 – भीमसेन जोशी – कला, संगीत
2003 – अभय बंग आणि राणी बंग – समाज सेवा, आरोग्य सेवा
2004 – बाबा आमटे – आरोग्य सेवा, समाज सेवा
2005 – रघुनाथ माशेलकर – विज्ञान
2006 – रतन टाटा – उद्योग
2007 – रा.कृ.पाटील – समाज सेवा
2008 – नानासाहेब धर्माधिकारी – समाज सेवा
2008 – मंगेश पाडगावकर – साहित्य
2009 – सुलोचना लाटकर – कला,सिनेमा
2010 – जयंत नारळीकर – विज्ञान
2011 – अनिल काकोडकर – विज्ञान
2015 – बाबासाहेब पुरंदरे – साहित्य
2021 – आशा भोसले – कला, संगीत
2022 – अप्पासाहेब धर्माधिकारी – समाज सेवा
2023 – अशोक सराफ – कला
नुकताच 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेता अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. अशोक सराफ यांनी अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपटात काम केले आहे. त्यांनी अनेक नाटकात सुद्धा काम केले आहे. त्यांना विनोदी कलाकार म्हणून ओळखल्या जात असले तरी त्यांनी अनेक गंभीर भूमिका सुद्धा साकारल्या आहेत. त्यांना चित्रपट सृष्टीतील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 2017 मध्ये अशोक सराफ यांना चित्रपट सृष्टीतील जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी फिल्मफेअर पुरस्कार ही जिंकलेले आहेत. त्यांनी ‘पांडू हवालदार’, ‘सवाई हवालदार’, ‘अशी ही बनवा बनवी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘गंमत जमत’, ‘भुताचा भाऊ’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, अश्या अनेक मराठी चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली आहेत. तसेच सिंघम, करणअर्जुन, कोयला, जोडी नंबर 1, येस बॉस, क्या दिल ने कहा, अश्या अनेक हिंदी चित्रपटात सुद्धा त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहेत.