मराठी व्याकरण
महत्त्वाचे शब्दसंग्रह
या लेखात आपण मराठी व्याकरणातील महत्त्वाचे शब्द पाहणार आहोत. जे की परीक्षेत वारंवार विचारल्या जातात. स्पर्धा परीक्षा म्हटल की व्याकरण हे आलच समजा त्यात शब्दसंग्रहावर सर्वात जास्त जोर. शब्दसंग्रहावर हमखास प्रश्न विचारले जातात. यात आपण मराठी व्याकरणातील महत्त्वाच्या म्हणी, समानार्थी शब्द, समानार्थी म्हणी, वाक्प्रचार व अर्थ, वाक्यप्रचार, सारखे भासणारे परंतु भिन्न अर्थाचे शब्द, एक शब्दाबद्दल शब्दसमुह, विरुद्धार्थी शब्द इत्यादी महत्त्वाचे शब्द आपण पाहणार आहोत.हे सर्व शब्द संग्रह महत्त्वाचे आहेत. पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग भरती, एसएससी भरती, रेल्वे भरती, वनरक्षक भरती, राज्यसेवा इत्यादी परीक्षेत शब्दसंग्रह वर प्रश्न विचारले जातात.खाली आपण गट पाडून शब्द दिले आहेत.
🔷 समानार्थी म्हणी : सर्वात आधी आपण मराठीतील महत्त्वाच्या म्हणी पाहणार आहोत,जे की सर्वसाधाणपणे आपल्या बोलीभाषेत वापरल्या जाते. सोबतच याच म्हणी परीक्षेत वारंवार विचारल्या जातात. सर्व महत्त्वाच्या म्हणी असून त्याच्या समान अर्थाच्या म्हणी त्यासमोर दिल्या आहेत.या ठिकाणी आपण समान अर्थाच्या म्हणी पाहत आहेत. म्हणी व त्याचे अर्थ
● गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोंधळ बरा होता – नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे
● घरोघरी मातीच्या चुली – पळसाला पाने तीनच
● चोरावर मोर – शेरास सव्वाशेर
● जशी देणावळ तशी खानावळ – दाम तसे काम
● पालथ्या घड्यावर पाणी – येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
● नव्याचे नऊ दिवस – तेरड्याचे रंग तीन दिवस
● नाव मोठं लक्षण खोटं – नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
● बेलाफुलाची गाठ पडणे – कावळा बसायला आणि फाटा तुटायला
● पी हळद अन हो गोरी – उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
● वराती मागून घोडे – बैल गेला अन झोपा केला
● वासरात लंगडी गाय शहाणी – गावंढया गावात गाढवीण सवाशीण
● आधी शिदोरी मग जेजूरी – आधी पोटोबा मग विठ्ठोबा
● आवळा देऊन कोहळा काढणे – पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
● कडू कारले तुपामध्ये तळले साखरेत घोळले तरी कडू ते कडूच – कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच
● कामा पुरता मामा – ताकापुरती आजी
● काखेत कळसा गावाला वळसा – तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
● करावे तसे भरावे – जैसी करणी वैशी भरणी
● खाई त्याला खवखवे – चोराच्या मनात चांदणे
● खाण तशी माती – बाप तसा बेटा
● आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी – मानेला गळू, पायाला जळू
● अडला हरि नि गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या प्रसंगी मूर्ख माणसाची सुद्धा खुशामत करावी लागते .
● अडली गाय फटके खाय – एखांदा माणूस अडचणीत सापडला की त्याला आणखी त्रास देणे.
● अति तेथे माती – कोणत्या ही गोष्टीचा अतिरेक हा वाईटत असतो.
● अति शहाणा त्याचा बैल रिकामा – स्वत:ला अतिशहाणा समजणारा प्रत्यक्षात कृती करत नाही .
● अति खाणे मसणात जाणे – खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो.
🔷 वाक्यप्रचार व अर्थ : वाक्प्रचार व त्याचे अर्थ यावर सुद्धा हमखास आपल्याला प्रश्न विचारल्या जाते त्यामुळे त्यांचे अर्थ लक्षात ठेवणे महत्त्वाचे ठरते.परीक्षेत दिलेले सर्व वाक्प्रचार हमखास वारंवार विचारल्या जाते. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ माहित असणे गरजेचे आहेत, कारण पोलीस भरतीत यावर प्रश्न असतो.खाली काही महत्त्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ दिलेले आहेत.
● गय करणे – क्षमा करणे
● न्यूनगंड वाटणे – कमीपणा वाटणे
● जीव मुठीत घेणे – फार घाबरणे
● जीव ओतणे – मन लावून काम करणे
● सुपारी देणे – आमंत्रण देणे
● तोंडाला तोंड देणे – उद्धटपणे बोलणे
● डोळे दिपणे – आश्चर्य वाटणे
● परिपाठ ठेवणे – सवय ठेवणे
● ब्रह्मांड कोसळणे – मोठे संकट येणे
● कागाळी करणे – तक्रार करणे
● खांदा देणे – मदत करणे
● खोबरे करणे – नाश करणे
🔷 एक शब्दाबद्दल शब्दसमूह : परीक्षेत एक शब्द दिला जातो व समोर एक शब्दसमूह दिला जातो किंवा आधी शब्दसमूह व त्यांनंतर त्या शब्दमूहाबद्दल एक शब्द विचारला जातो. या पद्धतीचे प्रश्न परीक्षेत वारंवार विचारल्या जातात. त्यामुळे शब्द संग्रह महत्त्वाचा ठरतो.आपण काही महत्त्वाचे शब्द व शब्दसमूह पाहणार आहोत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरतील.
● कृतज्ञ : उपकार जाणणारा
● असंख्य,अमाप : संख्या मोजता न येणारा
● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा
● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा
● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा
● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता
● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा
● कवयित्री : कविता करणारी
● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत
● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू
पाहणारा
● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा
● दानशूर : खूप दानधर्म करणारा
● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा
● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे
● गुराखी : गुरे राखणारा
● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा
● अंगण : घरापुढील मोकळी जागा
● गवंडी : घरे बांधणारा
● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा
● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा
🔷 सारखे भासणारे परंतू भिन्न अर्थाचे शब्द : आपल्या बोलीभाषेत असे अनेक शब्द आहेत, जे की आपण बोलताना वापरत असतो परंतू त्याचा मूळ अर्थ माहित नसतो. कधी कधी एक शब्द वापरतो परंतू त्याचा अर्थ वेगळाच असतो. भिन्न अर्थाचे परंतू सारखे दिसणारे शब्द आपण बघणार आहोत. यावर सहसा परीक्षेत प्रश्न विचारले जात नाही. परंतु तो शब्द विचारला गेला तर आपल्याला गोंधळून न जाता सोडवता यायला हवे. त्यामुळे खाली सारखे भासणारे परंतू भिन्न अर्थाचे शब्द दिलेले आहेत.
● अपत्य – संतती
● अपथ्य – अपायकारक अन्न
● अकरम – कृपावंत
● अकर्म – पापकृत्य
● अचल – स्थिर, गतिरहित
● अचला – पृथ्वी, हातरूमाल
● अडाणा – गायनातील एक राग
● अडाणी – आज्ञानी
● अनुभव – प्रत्यक्ष अनुभूती
● अनुभाव – प्रभाव
🔷 समानार्थी शब्द : परीक्षेत समानार्थी शब्द यावर हमखास प्रश्न विचारले जातात. समानार्थी शब्द गोंधळून टाकणारे असतात. त्यामुळे समानार्थी शब्द माहीत असणे आवश्यक असते.
◆ चक्रपाणी – विष्णु, रमापती, नारायण, केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
◆ चतुर – धूर्त, हुशार, चाणाक्ष
◆ चाल – चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
◆ छाया – सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
◆ छाप – ठसा, छापा, अचानक हल्ला
◆ छळ – लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
◆ छिद्र – छेद, दोष, भोक, कपट
◆ छडा – तपास, शोध, माग
◆ जतावणी – सूचना, इशारा, ताकीद
◆ जन्म – उत्पति, जनन, आयुष्य
◆ जप – ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
◆ जबडा – तोंड, दाढ
◆ जुलूम – जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
◆ जरब – दहशत, दरारा, धास्ती, वचक
◆ जल – जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
◆ झाड – वृक्ष, पादप, दुम, तरु
◆ झुंज – टक्कर, संघर्ष, लढा
◆ झुणका – बेसन, पिठले, अळण
◆ झटका – झोक, डौल, शरीराचा तोल, कल
◆ चढण – चढ, चढाव, चढाई
◆ चातुर्य – हुशारी, कुशलता, चतुराई
◆ चवड – ढीग, रास, चळत
◆ चव – रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
◆ चंद्रिका – कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना
◆ चव – रुची, गोडी
◆ चरण – पाय, पाऊल
◆ चरितार्थ – उदरनिर्वाह
◆ चक्र – चाक
◆ चऱ्हाट – दोरखंड
◆ चाक – चक्र
◆ चंद्र – शशी, रजनीनाथ, इंदू
◆ चिंता – काळजी
◆ चिडीचूप – शांत
◆ चिमुरडी – लहान
◆ चूक – दोष
◆ चेहरा – मुख
◆ चौकशी – विचारपूस
◆ छंद – नाद, आवड
◆ छान – सुरेख, सुंदर
◆ छिद्र – भोक
◆ जग – दुनिया, विश्व
◆ जत्रा – मेळा
◆ जन – लोक, जनता
◆ जमीन – भूमी, धरती, भुई
◆ जंगल – रान
◆ जीव – प्राण
◆ जीवन – आयुष्य, हयात
◆ जुलूम – अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय
◆ झाड – वृक्ष, तरू
◆ झोपडी – कुटीर, खोप
◆ झोप – निद्रा
◆ झोका – झुला
◆ झेंडा – ध्वज, निशाण
◆ ठग – चोर
◆ ठिकाण – स्थान
◆ डोके – मस्तक, शीर्ष, शीर
◆ डोळा = नेत्र, नयन, लोचन
◆ डोंगर = पर्वत, गिरी
◆ ढग = मेघ, जलद, पयोधर, अभ्र
◆ ॠण = कर्ज
◆ तक्रार = गाऱ्हाणे
◆ तळे = तलाव, सरोवर, तडाग
◆ त्वचा = कातडी
◆ तारण = रक्षण
◆ ताल = ठेका
◆ तुरंग = कैदखाना, बंदिवास
◆ तुलना = साम्य
◆ थट्टा = मस्करी, चेष्टा
◆ थवा = समूह
◆ थोबाड = गालपट
◆ दगड = पाषाण, खडक
◆ दरवाजा = दार, कवाड
◆ दाम = पैसा
◆ दृश्य = देखावा
◆ दृढता = मजबुती
◆ दिवस = दिन, वार, वासर
◆ दिवा = दीप, दीपक
◆ दूध = दुग्ध, पय
◆ द्वेष = मत्सर, हेवा
◆ देव = ईश्वर, विधाता
◆ देश = राष्ट्र
◆ देखावा = दृश्य
◆ दार = दरवाजा
◆ दारिद्र्य = गरिबी
◆ दौलत = संपत्ती, धन
◆ धरती = भूमी, धरणी
◆ ध्वनी = आवाज, रव
◆ नदी = सरिता
◆ नजर = दृष्टी
◆ नक्कल = प्रतिकृती
◆ नमस्कार = वंदन, नमन
◆ नातेवाईक – नातलग
◆ नाच – नृत्य
◆ निश्चय = निर्धार
◆ निर्धार = निश्चय
◆ निर्मळ = स्वच्छ
◆ नियम = पद्धत
◆ निष्ठा = श्रद्धा
◆ नृत्य = नाच
◆ नोकर = सेवक
🔷 विरुद्धार्थी शब्द : यावर एक तरी प्रश्न परीक्षेत विचारल्या जाते. विरुद्धार्थी शब्द गोंधळून टाकणारे असतात त्यामुळे याचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे असते. ज्यावेळी आपण भरपूर शब्द वाचून काढतो त्यावेळी आपला एक मार्क पकला समजायचा.
● रसिक x अरसिक
● उंच x सखल
● आवक x जावक
● कमाल x किमान
● उच्च x नीच
● आस्तिक x नास्तिक
● अल्पायुषी x दीर्घायुषी
● अर्वाचीन x प्राचीन
● उगवती x मावळती
● अपराधी x निरपराधी