26 एप्रिल 2024 चालू घडामोडी
प्रश्न १) नुकताच राष्ट्रीय पंचायती राज दिवस कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – 24 एप्रिल
◾ पंचायती राज दिवस हा भारतातील पंचायती राज व्यवस्थेचा महत्त्व सांगणारा दिवस असून, दरवर्षी हा दिवस २४ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. पंचायती राज मंत्रालयाव्दारे राष्ट्रीय स्तरावर हा दिवस साजरा करण्यात येतो. याच दिवसाला राष्ट्रीय स्थानिक स्वराज्य दिन म्हणून सुद्धा साजरा करतात. २४ एप्रिल १९९३ रोजी ७३ व्या घटनादुरुस्ती नुसार पंचायत राज कायदा लागू करण्यात आला. तत्कालीन भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २४ एप्रिल २०१० रोजी पहिल्यांदा पंचायती राज दिवस साजरा करण्याची घोषणा केली.
प्रश्न २) कोणत्या देशाने अलीकडेच भारताचे पहिले संरक्षण सल्लागार म्हणून कर्नल एडिसन नेप्योची नियुक्ती केली आहे?
उत्तर – पापुआ न्यू गिनी
◾ नुकतेच पापुआ न्यू गिनी (Papua New Guinea) या देशाने कर्नल एडिसन नाप्यो (Colonel Edison Napyo) यांची भारताचे संरक्षण सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
◾ पापुआ न्यू गिनी (Papua New Guinea) : राजधानी – पोर्ट मोरेस्बी, चलन – पुआ न्यू गिनीयन किना, पंतप्रधान – जेम्स मोरापे
प्रश्न ३) कोणत्या देशाचा टेनिसपटू गार्बिन मुगुरुझो ब्लँकोने अलीकडेच निवृत्ती जाहीर केली आहे?
उत्तर – स्पेन
◾ गार्बीन्या मुगुरुझा (Garbiñe Muguruza Blanco) : हि स्पेन या देशाची एक व्यावसायिक टेनिसपटू आहे. तीने २०१६ च्या फ्रेंच ओपन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले आहे. २०१७ मध्ये ती विंबल्डन स्पर्धेची विजेती होती.
प्रश्न ४) नुकतेच न्यूजवीकने भारतातील सर्वोत्तम खाजगी रुग्णालय कोणते घोषित केले आहे?
उत्तर – मेदांता, गुरुग्राम
◾ नुकतेच न्यूजविकने (News Week) भारतातील सर्वोत्तम खाजगी रुग्णालय कोणते हा अहवाल सादर केला. त्यात न्यूजविकने ३० देशातील २४०० रुग्णालयांची पडताळणी केली. गुरुग्राम मधील मेदांता या रुग्णालयाने 5 व्यांदा भारतातील सर्वोत्कृष्ट खाजगी रुग्णालय म्हणून स्थान मिळविले आहे. सोबतच जगभरातील रुग्णालयांमध्ये २५० व्या स्थानी समाविष्ट भारतातील एकमेव खाजगी रुग्णालय ठरले.
प्रश्न ५) नेप्टिस फिलारा हे दुर्मिळ फुलपाखरू अलीकडे कोणत्या राज्यात सापडले आहे?
उत्तर – अरुणाचल प्रदेश
◾ नेप्टिस फिलिरा (Neptis Philyra) : भारतातील टेल व्हॅली वन्यजीव अभयारण्यात नुकतीच नेप्टिस फिलिरा नावाची दुर्मिळ फुलपाखराची प्रजाती प्रथमच सापडली.
– लाँग स्ट्रिक सेलर (Long – Streak sailor) म्हणून ही प्रजाती ओळखली जाते.
– आजपर्यंत ही प्रजाती कोरिया, जपान, चीन, सायबेरिया, पूर्व आशियातील विविध प्रदेशांमध्ये आढळत होती.
– या फुलपाखराला वरच्या बाजूला तपकिरी – काळा तर खालच्या बाजूस पिवळ्या – तपकिरी रंगाचे दातेदार पंख असतात.
– या प्रजाती सदाहरित वने, नदी, नदीचा खडकाळ प्रवाह इत्यादी ठिकाणी आढळतात.
प्रश्न ६) कोणत्या देशाच्या गायिका रिजवाना चौधरी बन्या यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर – बांगलादेश
◾ रिजवाना चौधरी बन्या (Rezwana Choudhury Bannya) : यांचा जन्म १३ जानेवारी १९५७ ला बांगलादेश मध्ये झाला. त्या व्यवसायाने गायक तसेच प्रोफेसर आहेत. त्यांना रविंद्र संगीत गायिका म्हणून सुद्धा ओळखल्या जाते, कारण त्या रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या सोबतच संगीतबद्ध केलेल्या गाणी गातात. त्यांना बांगलादेशचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे. सोबतच त्यांना २०२४ चा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
प्रश्न ७) डेटा ट्रॅफिकच्या बाबतीत अलीकडे जगातील सर्वात मोठा मोबाइल ऑपरेटर कोण बनला आहे?
उत्तर – रिलायन्स जिओ
प्रश्न ८) नुकतेच Adventures of a Travelling Monk: A Memoir Salt हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
उत्तर – इंद्रधुम्न स्वामी