18 मे 2024 (चालू घडामोडी)
चालू घडामोडी (१८ मे २०२४), राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय, खेळ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, भूगोल, अर्थव्यवस्था, पर्यटन, प्रकल्प, महत्त्वाचे दिन, दिनविशेष, महत्त्वाची व्यक्ती, पुरस्कार, पुस्तके, प्रसिद्ध व्यक्ती, इत्यादी घटकावर आधारीत महत्त्वाच्या चालू घडामोडी, chalu ghadamodi, current affairs in marathi, weekly current affairs, monthly current affairs in marathi, marathi chalu ghadamodi, may month current affairs, Argentina inflation, Argentina launch new currency, neeraj chopra win federation cup 2024, UNESCO’s Memory of the World Asia-Pacific Regional Register Ramcharitmanas, Panchatantra, Sahṛdayaloka-Locana, etc. Imp current affairs, आगामी परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मुद्दे विश्लेषण करून चालू घडामोडी, चालु घडमोडी, सर्व स्पर्धा परीक्षा करिता उपयुक्त अशा महत्त्वाच्या चालू घडामोडी, सर्व प्रश्न महत्त्वाचे असून, यातील प्रत्येक मुद्दे हे विश्लेषण करून महत्त्वाचे आहे.
18 मे 2024 चालू घडामोडी
प्रश्न १) अलीकडेच कोणत्या देशाने त्यांच्या चलनातील आतापर्यंतची सर्वाधिक १० हजार पेसोची नोट चलनात आणली आहे?
उत्तर – अर्जेंटिना
अर्जेंटिना या देशाने नुकतीच सर्वात मोठी चलनी नोट म्हणजेच १०,००० पेसोची नोट सादर केली आहे. या नोटाची किंमत फक्त ११.३४ डॉलर एवढी आहे. अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर माइले (Javier Milei) यांना त्यांच्या आधीच्या सरकारांकडून मिळालेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केल्याचे दिसून येते. या आधी अर्जेंटिनाने २००० पेसोची नोट लाँच केली होती.
अर्जेंटिना (Argentine Republic) : राजधानी – ब्यूनस आयर्स , अधिकृत भाषा – स्पॅनिश , चलन – अर्जेंटाइन पेसो ,
राष्ट्राध्यक्ष – जेव्हियर माइली , उपराष्ट्राध्यक्ष – व्हिक्टोरिया व्हिलारुएल
प्रश्न २) नुकतेच फेडरेशन करंडक स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर भाला फेकून सुवर्ण पदक जिंकले आहे ?
उत्तर – ८२.२७ मीटर chalu ghadamodi
अलिकडेच भुवनेश्वरमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या फेडरेशन कप २०२४ मध्ये पुरुषांच्या भालाफेक या गटात, ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने चौथ्या फेरीत ८२.२७ मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये नीरज चोप्राला संघर्ष करावा लागला होता, कारण की तो तीन फेऱ्यांनंतर दुसऱ्या स्थानावर होता. नीरज चोप्राने २०२१ मध्ये याच स्पर्धेत त्याने ८७.८० मीटर भालाफेकून सुवर्ण पदक जिंकले होते. त्यानंतर चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले होते, डायमंड लीग २०२२ मध्ये तो चॅम्पियन बनला होता, तर २०२३ मध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनला असून, चीनमध्ये आयोजीत आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
प्रश्न ३) नुकतेच कोणत्या भारतीय धावपटूने एसईसी आउटडोर ट्रैक एंड फील्ड चैंपियनशिप 2024 मध्ये 1500 मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे?
उत्तर – परवेज खान
लुईझियाना (Louisiana) येथे आयोजित SEC Outdoor Track & Field Championships 2024 या महाविद्यालयीन ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या परवेज खानने पुरुष गटातील १५०० मीटरमध्ये सुवर्ण पदक पटकावले. परवेज खानने अंतिम फेरीत आघाडी घेत ३ मिनिटे आणि ४२.७३ सेकंदात हि स्पर्धा जिंकली. दुसऱ्या स्थानावर यूएसएचा मॅक्स हार्डिन याने ३:४३.३९ सेकंदात , तर तिसऱ्या स्थानावर डाल्टन हेंगस्ट याने ३:४३.५१ सेकंदात हि रेस पार केली.
– परवेज खान भारतीय धावपटू असून, तो फ्लोरिडा विद्यापीठात (अमेरिका) शिष्यवृत्तीवर शिक्षण घेत आहे. तो ऍथलेटिक्स मीटमध्ये (athletics meets) फ्लोरिडा गेटर्सचे प्रतिनिधित्व करतो.
– दक्षिणपूर्व परिषद (Southeastern Conference) (SEC) दरवर्षी या स्पर्धेचे / चॅम्पियनशिपचे आयोजन करते. हि स्पर्धा अमेरिकेतील आग्नेय भागात असलेल्या विद्यापीठांमधील ऍथलीट्सना विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी एकत्रित आणते. current affairs in marathi
प्रश्न ४) नुकतेच कोणत्या भारतीय साहित्यकृतींचा UNESCO च्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये समावेश करण्यात आले आहे ?
उत्तर – रामचरितमानस, पंचतंत्र आणि सह्रदयलोक-लोकन
नुकतेच भारताचे प्रसिध्द रामचरितमानस, पंचतंत्र आणि सहदयलोक-लोकाना (Ramcharitmanas, Panchatantra, Sahṛdayaloka-Locana) या साहित्यकृतींचा समावेश ‘युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया-पॅसिफिक रिजनल रजिस्टर’ (UNESCO’s Memory of the World Asia-Pacific Regional Register) मध्ये करण्यात आला आहे. हा क्षण भारतासाठी अभिमानास्पद आहे. हा समावेश भारताच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाची पुष्टी करते. पंचतंत्र, सह्रदयलोक-लोकना आणि रामचरितमानस ही अशी साहित्यकृती आहे, ज्याने भारतीय संस्कृती आणि सभ्यतेवर खोलवर प्रभाव टाकला आहे. सोबतच भारतीय साहित्यकृतीला आकार दिला आहे. या साहित्याने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मदत केली आहे. भारतातील आणि भारताबाहेरील वाचकांवर आणि कलाकारांवर एक वेगळीच आणि उल्लेखनीय छाप सोडली आहे. ‘सहृदयलोक-लोकना’ चे लेखक ‘आचार्य आनंदवर्धन’ , ‘पंचतंत्र’ चे लेखक ‘पं. विष्णू शर्मा’ आणि ‘रामचरितमानस’ चे लेखक ‘गोस्वामी तुलसीदास’ हे आहेत. चालू घडामोडी
युनेस्को (United Nations Educational, Scientific and Cultural Organization) : स्थापना – १६ नोव्हेंबर १९४५ , मुख्यालय – पॅरिस, फ्रान्स , महासंचालक – ऑड्रे अझौलेचालू आहेत