09 मे 2024 (चालू घडामोडी)
०९ मे २०२४ रोजीच्या, महत्त्वपूर्ण चालू घडामोडी ज्यात राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय, खेळ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, भूगोल, अर्थव्यवस्था, पर्यटन, विकास, महत्त्वाचे दिवस, महत्त्वाची व्यक्ती, पुरस्कार, इत्यादी घटकावर आधारीत महत्त्वाच्या चालू घडामोडी. महत्त्वाचे मुद्दे जे परीक्षेत हमखास विचारले जातात. ते सर्व मुद्दे विश्लेषण करून अभ्यासत आहे. सर्व प्रश्न आगामी परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. Chalu ghadamodi, मे महिन्यातील सर्व चालू घडामोडी. खाली सर्व प्रश्न महत्त्वाचे असून आगामी परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. Current affairs in marathi, weekly current affairs, monthly current affairs, chalu ghadamodi, police bharti.
प्रश्न १) नुकताच जागतिक अस्थमा दिन कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – ७ मे
🔷 जागतिक अस्थमा दिन (World Asthma Day) : दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक अस्थमा दिवस साजरा केला जातो. यंदाचा अस्थमा दिवस ७ मे (मंगळवार) रोजी, साजरा करण्यात आला. १९९८ मध्ये पहिला जागतिक अस्थमा दिवस आयोजीत करण्यात आला होता. यालाच जागतिक दमा दिन म्हणून सुध्दा ओळखल्या जाते. १९९३ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा (GINA) (जागतिक आरोग्य संघटनेची सहयोगी संस्था) या संस्थेद्वारे हा दिवस आयोजीत करण्यात येतो. दरवर्षी GINA या दिवसासाठी एक थीम निवडते, २०२४ साठी GINA ने “दमा एज्युकेशन एम्पॉवर्स” (Asthma Education Empowers) ही थीम निवडली आहे. दमा बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी मे महिन्याचा पहिल्या मंगळवारी या दिवसाचे चे आयोजन केले जाते. हा दिवस जगातील सर्वात महत्त्वाचा अस्थमा जागरूकता आणि शैक्षणिक कार्यक्रमांपैकी एक आहे.
प्रश्न २) अलीकडेच कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी ‘जोश राऊल मुलिनो’ यांची निवड झाली आहे?
उत्तर – पनामा
🔷 जोस राउल मुलिनो (José Raúl Mulino) यांनी नुकत्याच झालेल्या पनामाच्या अध्यक्षीय निवडणुकीत जवळपास ३५% मते मिळवून, प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ९% जास्त मते घेऊन आघाडीने विजय मिळवला आहे. लॉरेंटिनो कॉर्टिझो (Laurentino Cortizo) यांच्या जागी मुलीनो राष्ट्राध्यक्ष होतील. या निवडणुकीत जोस मुलिनो हे रिकार्डो मार्टिनेली यांच्या बाजूने उभे राहिले होते.
🔷 पनामा (Republic of Panama) : मध्य अमेरिकेतील देश आहे. राजधानी – पनामा शहर , अधिकृत भाषा – स्पॅनिश , चलन – बाल्बोआ, अमेरिकन डॉलर
प्रश्न ३) नुकतेच कोणत्या राज्यातील अजराखला भौगोलिक संकेत (GI) टॅग मिळाला आहे?
उत्तर – गुजरात
🔷 नुकतेच पेटंट, डिझाइन्स आणि ट्रेडमार्क्स च्या कंट्रोलर जनरल (CGPDTM) द्वारे गुजरात राज्यातील पारंपारिक कारागिरांना समृद्ध अशा सांस्कृतिक वारशाची महत्त्वपूर्ण ओळख म्हणून प्रसिध्द असलेल्या ‘कच्छ अजराख’ (Kutch Ajrakh) ला प्रतिष्ठित भौगोलिक संकेत (Geographical Indication) प्रमाणपत्र मिळाले आहे. अजराख (Ajrakh) ही एक कापड हस्तकला आहे. गुजरात राज्यातील सांस्कृतीक प्रदेशात विशेषत: बारमेर, सिंध, आणि कच्छ या प्रदेशांमध्ये, अजराख ही पारंपरिक हस्तकला आढळून येते. या प्रदेशांमध्ये या हस्तकलेला आदरणीय स्थान असून, तिचा वारसा या ठिकाणी सहस्राब्दिक आहे.
– “अजराख” (Ajrakh) हे नाव “अझरक” (Azrak) या शब्दावरून घेण्यात आले आहे. Azrak म्हणजेच इंडिगो (Indigo), हा असा एक सुप्रसिद्ध पदार्थ आहे, जो शक्तिशाली रंग तयार करण्यासाठी वापरला जातो. बहुतेक वेळा इंडिगो निळसर रंगाचा परिणाम प्राप्त करण्यासाठी वापरला जातो. अजराख हस्तकलेच्या छपाईमध्ये पारंपरिक पद्धतीचे तीन रंग असतात, ज्यात i) निळा (आकाशाचे प्रतिनिधित्व करतो), ii) लाल (जमीन आणि आग दर्शविते) आणि iii) पांढरा (आकाशातील ताऱ्यांच प्रतीक). अजराख हस्तकलेमध्ये उपचारित सुती कापडावर हाताने ब्लॉक प्रिंटिंगची (hand-block printing) एक प्रकारची सूक्ष्म प्रक्रिया करण्यात येते, यामुळे त्या कापडावर समृद्ध प्रतीकात्मक परिणाम घडून येतो. या सूक्ष्म प्रक्रियेमुळे कापडाचे रूपांतर जटिल डिझाइनमध्ये होते. अजराख कापडाच्या निर्मितीसाठी फॅब्रिक कापड आठ वेळा धुवावे लागते. या कापडांवर उठाव दिसण्यासाठी भाजीपाला आणि खनिज रंगांचा वापर केला जातो, यामुळे कपड्यांवर दोलायमान रंग आणि कधीच नष्ट न होणाऱ्या रंगाचा परिणाम दिसून येतो. अजराख ही कला कच्छच्या प्रदेशात ४०० वर्षांहून अधिक काळापासून प्रचलित आहे. हि कला सिंध मुस्लिमांनी शोधलेली आहे. या प्रदेशाच्या सांस्कृतिक जडणघडणीत हि हस्तकला खोलवर रुतली गेली आहे. कच्छ प्रांतातील भटक्या जाती आणि शेती करणारे रबारी, मालधारी आणि अहिर यांसारखे जनजाती/ समुदाय अजराख कापडाचा वापर पगडी, लुंगी किंवा स्टोल्स म्हणून परिधान करतात.
प्रश्न ४) नुकताच सीमा रस्ते संघटनेचा ६५ वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – ७ मे
🔷 सीमा रस्ते संघटना (Border Roads Organization) : ज्यालाच संक्षिप्त मध्ये BRO म्हणून संबोधल्या जाते. ही भारतीय लष्कराची एक संस्था आहे, जी रस्ते बांधणी करते. ७ मे १९६० ला या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. हि संस्था भारतीय सिमेवर तसेच मित्र राष्ट्राच्या अवघड क्षेत्रात रस्ते बांधणी करते तसेच त्याची निगा राखण्याची जबाबदारी पार पाडते. सीमा रस्ते संघटना भारताच्या उत्तरेकडील आणि ईशान्येकडील राज्यांतील दुर्गम भागात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आणि भारताच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी संरक्षण मंत्रालया अंतर्गत कामकाज पाहते. या संस्थेचे ब्रीदवाक्य “श्रमेण सर्वम साधम” (Shramena Sarvam Sadhyam) हे आहे, ज्याचा अर्थ ‘कष्टाने सर्व काही साध्य होते.’
प्रश्न ५) नुकतेच कोणत्या देशाने भारतीय प्रदेश दर्शविणारी 100 रुपयांची नवीन नोट छापण्याचा विचार केला आहे?
उत्तर – नेपाळ
🔷 नेपाळ सरकारने भारताच्या अधिपत्याखाली असलेल्या लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी या क्षेत्रांचे वर्णन दर्शवणारी नवीन चलनी नोट छापण्यासाठी निर्णय घेतला होता. परंतू यासाठी भारत सरकारने विरोध दर्शविला आहे. भारताच्या पाच राज्याला नेपाळची सीमा लागलेली आहे. यात बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीम या पाच राज्याला नेपाळची एकूण १८५० किलोमीटरची सीमा लागलेली आहे.
🔷 नेपाळ (Nepal) : राजधानी – काठमांडू , चलन – नेपाळी रुपया , अधिकृत भाषा – नेपाळी ,
राष्ट्राध्यक्ष – राम चंद्र पौदेल, पंतप्रधान – पुष्पा कमल दाहाल
प्रश्न ६) नुकताच आयसीसी महिला T20 विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे?
उत्तर – बांगलादेश
🔷 नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बांगलादेशमध्ये आयोजीत आगामी नवव्या ICC महिला T20 वर्ल्ड कप 2024 च्या सामन्यांचे अनावरण केले आहे. हे सामने ३ ते २० ऑक्टोबर या कालावधीत खेळले जातील. T20 World Cup 2024 मध्ये एकूण १० संघ भाग घेतील, ज्यांचे एकूण २३ सामने खेळवल्या जातील. हे सामने बांगलादेशातील दोन ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. शेरे बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका आणि सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिल्हेट