Site icon MPSC Point

चालू घडामोडी (06 मे 2024)

चालू घडामोडी (06 मे 2024)

 

०६ मे २०२४ रोजीच्या, महत्वपूर्ण चालू घडामोडी ज्यात राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय, खेळ, महत्त्वाच्या संस्था, सरकारी योजना, राजकीय, सामाजिक, इत्यादी घटकावर आधारित तसेच परीक्षेला उपयुक्त अशा चालू घडामोडी (Current affairs in marathi) अभ्यासत आहे. सर्व प्रश्न महत्त्वाचे असून, परिक्षेकरीता उपयुक्त आहेत. सर्व स्पर्धा परीक्षा करिता उपयुक्त चालू घडामोडी. Current affairs, चालू घडामोडी, दैनिक चालू घडामोडी, प्रश्न, gk, सामान्य ज्ञान, मासिक चालू घडामोडी

प्रश्न १) BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोणता देश करणार आहे?
उत्तर – भारत
🔶 २००८ मध्ये पुणे येथे प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रथमच बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) ने २०२५ मध्ये BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपचे आयोजन भारत करेल असे जाहिर केले. ही स्पर्धा गुवाहाटी येथील नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (National Center of excellence) येथे आयोजित केले आहे.
– या प्रतिष्ठित स्पर्धेव्दारे जगभरातील तरुण बॅडमिंटन खेडाळूंना आपल्या प्रतिभांचे तसेच कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी आणि उच्च स्तरावर आपल्या ध्येयाला गाठण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. भारतामध्ये या स्पर्धेचे आयोजन करणे हे देशातील खेळातील टप्पा वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते आणि बॅडमिंटन खेडाळूंना करियर करण्यासाठी चांगली संधी प्रदान करते.
– बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (Badminton World Federation – BWF) ही बॅडमिंटन खेळासाठी असलेली एक आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था असून, याची स्थापना १९३४ मध्ये, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (International Olympic committee – IOC) मान्यतेनुसार स्थापन करण्यात आली. BWF चे मुख्यालय मलेशिया मधील क्वालालंपूर या ठिकाणी आहे. BWF या संघटने व्दारे जागतिक स्तरावर बॅडमिंटन खेळाच्या विकासावर देखरेख ठेवणे, यात उच्चीत संशोधन करणे आणि या खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम करते. सध्या BWF चे अध्यक्ष म्हणून Poul-Erik Høyer Larsen हे काम पाहत आहेत.

 

प्रश्न २) अलीकडे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने ग्रँडमास्टर या पदवीने कोणाला सन्मानित केले आहे?
उत्तर – वैशाली रमेश बाबू
🔶 भारतीय बुद्धिबळपटू वैशाली रमेश बाबू यांना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (International Chess Federation) नुकतेच ग्रँडमास्टर या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. हंपी कोनेरू आणि हरिका द्रोनावली यांच्या नंतर वैशाली रमेश बाबू ही भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर ठरली आहे.
🔶 जागतीक बुद्धिबळ महासंघ (International Chess Federation) : स्थापना – २० जुलै १९२४ , मुख्यालय – अथेन्स, ग्रीस , सभासद देश – १५३

 

प्रश्न ३) अलीकडेच NISE चे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
उत्तर – मोहम्मद रिहान
🔶 प्रोफेसर मोहम्मद रिहान हे AMU मध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागात कार्यरत असून, त्यांची राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (National Institute of Solar Energy) (NISE) या ठिकाणी महासंचालक म्हणून म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था ही संस्था भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या (MNRE) अंतर्गत येणारी स्वायत्त संस्था आहे. रिहान यांची नियुक्ती विषय तज्ञ आणि वरिष्ठ IAS अधिकारी यांनी डिसेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या मुलाखतीनंतर निवड समितीने त्यांच्या महासंचालक (DG) पदावरील नियुक्तीला मान्यता दिली.
🔶 राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (National Institute of Solar Energy) (NISE) : स्थापना – २४ ऑक्टोंबर २०१३ , मुख्यालय – गुरगाव, भारत , मंत्रालय – नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय , भारत सरकार

 

महत्त्वाच्या चालू घडामोडी,

प्रश्न ४) नुकतीच कोणाची जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – हितेश कुमार सेठिया
🔶 हितेश कुमार सेठिया यांची कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे (Jio Financial Services) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (MD and CEO) म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

प्रश्न ५) अलीकडेच दिल्लीवरीने सर्व महिला लॉजिस्टिक हब कोठे सुरू केला आहे?
उत्तर – राजस्थान
🔶 दिल्लीवरीने (Delhivery) अलीकडेच सीकर, राजस्थान या ठिकाणी एक सर्व-महिला लॉजिस्टिक हब (logistics hub) सुरू केला आहे. या मॉडेलची प्रतिकृती इतर ठिकाणी देखील बनवण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीच्या लॉजिस्टिक उद्योगात महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे आणि यात महिलांचा अधिकाधिक सहभाग करुन घेणे, सोबतच कंपनीत विविधतेला चालना देणे हे यामागील हेतू आहे.

 

प्रश्न ६) नुकत्याच झालेल्या आशियाई अंडर-20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत?
उत्तर – २९
🔶 नुकत्याच झालेल्या आशियाई अंडर-20 (Asian U20) ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 (Athletics Championships 2024) मध्ये भारताने एकूण २९ पदके मिळवली असून, भारत तिसऱ्या स्थानावर आहे. ही स्पर्धा २४ ते २७ एप्रिल दरम्यान दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे पार पडली असून, या चॅम्पियनशिपमध्ये भारताने ७ सुवर्ण, ११ रौप्य आणि ११ कांस्य पदके जिंकून तिसरे स्थान पटकावले आहे. यात एकूण ६० भारतीय खेडाळूंनी सहभाग घेतला होता (३१ पुरुष आणि २९ महिला).
🔶 चीनने २५ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३ कांस्य पदक जिंकून पदकतालिकेत प्रथम स्थान पटकावले आहे. तर जपानने यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या दोन्ही देशापेक्षा भारताची एकूण पदकांची संख्या जास्त असली तरीही भारताने कमी सुवर्णपदके जिंकली असल्या कारणाने परिणामी क्रमवारीत तिसरे स्थान प्राप्त केले आहे.

 

प्रश्न ७) नुकताच गोल्ड मॅन एन्व्हायर्नमेंटल अवॉर्ड २०२४ कोणाला देण्यात आला आहे?
उत्तर – आलोक शुक्ला
🔶 आलोक शुक्ला हे वन आणि आदिवासी हक्क कार्यकर्ते / समाजसेवक असून, त्यांनी छत्तीसगढ मधील हसदेव अरण्य क्षेत्रातील २१ नियोजित कोळसा खाणींमधून ४.४५ लाख एकर जैवविविधतेने समृद्ध असलेली जंगले वाचवण्यासठी यशस्वी मोहिम राबवली होती. त्यांच्या या यशस्वी मोहिमेसाठी त्यांना प्रतिष्ठित गोल्डमन पर्यावरण पुरस्कार २०२४ (Goldman Environmental Prize) ने सन्मानित करण्यात आले आहे.
– गोल्डमन एन्व्हायर्नमेंटल प्राईज (The Goldman Environmental Prize) हे पर्यावरणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना किंवा संस्थेला दिला जातो. हा पुरस्कार गोल्डमन एन्व्हायर्नमेंटल फाउंडेशन द्वारे दिला जातो. या पुरस्काराला ग्रीन नोबेल पुरस्कार (Green Nobel Prize) म्हणूनही ओळखले जाते. १९८९ मध्ये या पुरस्काराची स्थापना रिचर्ड आणि रोंडा गोल्डमन यांनी केली होती.

 

प्रश्न ८) अलीकडेच २६ वे नौदल प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
उत्तर – दिनेश कुमार त्रिपाठी
🔶 ३० एप्रिल २०२४ रोजी, ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी (PVSM, AVSM, NM) यांनी भारतीय नौदलाचे २६ वे नौदल प्रमुख म्हणून कमान स्वीकारली आहे. त्यांनी ॲडमिरल आर हरी कुमार (PVSM, AVSM, VSM, ADC) यांच्या जागी पदभार स्वीकारला आहे.

Exit mobile version