चालू घडामोडी (Current affairs) 

10 एप्रिल 2024 चालू घडामोडी

 

चालू घडामोडी हा स्पर्धा परीक्षा दृष्टीकोनातून महत्त्वाचा भाग आहे. दररोज चालू घडामोडी महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी १० एप्रिल २०२४ रोजीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण पाहणार आहोत. एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, रेल्वे भरती, एसएससी भरती, साठी चालू घडामोडी महत्त्वाच्या आहेत.

 

प्रश्न 1) अलीकडेच आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू कोण बनला आहे?

उत्तर – विराट कोहली

🔷 विराट कोहली (Virat Kohli) : हा आयपीएल मध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू ठरला आहे. विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाकडून खेळतो. त्याने आयपीएल मध्ये २४२ मॅचेस खेळले असून यात त्याने ८ शतके आणि ५२ अर्धे शतके ठोकली आहे. विराट कोहली पाटोपाट क्रिस गेल याचा नंबर लागतो त्याने आयपीएल मध्ये ६ शतके तर ३१ अर्धे शतके ठोकली आहे. तिसऱ्या क्रमांकावर जोस बटलर याचा नंबर लागतो त्याने ५ शतके मारली आहे.

 

प्रश्न 2) गंगू रामसे यांचे नुकतेच निधन झाले, ते कोण होते?

उत्तर – सिनेमॅटोग्राफर

🔷 गंगू रामसे (Gangu Ramsay) : गंगू रामसे यांचे नुकतेच वयाच्या ८३व्या वर्षी निधन झाले असून, ते सिनेसृष्टीशी संबंधित होते. त्यांनी सिनेमॅटोग्राफर, फिल्ममेकर, निर्माता म्हणून काम केले आहे. ‘विराना’ , ‘पुराणी हवेली’ , ‘पुराना मंदीर’ , ‘दो गज जमीन के निचे’ , ‘तहखाना’ इत्यादी चित्रपटाशी ते संबंधित होते.

 

प्रश्न 3) जर्दाळू ब्लॉसम फेस्टिव्हल 2024 नुकताच कुठे सुरू झाला?

उत्तर – लडाख

🔷 जर्दाळू ब्लॉसम फेस्टिवल (Apricot Blossom Festival in Ladakh) : हा उत्सव लडाख टूरिझम द्वारे आयोजित करण्यात आला असून, हा उत्सव ४ ते १७ एप्रिल पर्यंत आयोजित केला आहे. यात स्थानिक लोक त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच लोक हस्तकलेचे प्रदर्शन सादर करतात. सोबतच जर्दाळू फुलांचे या ठिकाणी रस, जाम, सिरप ही उत्पादने सुद्धा पाहवयास मिळतात.

 

प्रश्न 4) नुकताच जर्मन लोकशाही पुरस्कार कोणाला मिळेल?

उत्तर – युलिया नवलानाया

🔷 युलिया नवलानाया (Yulia Navalnaya) : नुकताच जर्मन लोकशाही पुरस्कार (German Democracy Prize) युलिया नवलानाया यांना मिळाला आहे. हा पुरस्कार १९६० मध्ये सत्तेत आलेल्या लुडविग एर्हार्ड याच्या नावावर देण्यात येतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संवाद, आणि लोकशाही साठी पुढे येणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.

 

प्रश्न 5) कोणत्या देशाने अलीकडेच आपला रोजगार व्हिसा कार्यक्रम बदलला आहे?

उत्तर – न्यूझीलंड

🔷 ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाने स्थलांतर (immigrants) करणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी व्हिसा नियम कडक केल्यानंतर, आता न्यूझीलंडने सुद्धा त्यांच्या व्हिसा नियमात बदल केले आहे. नवीन मार्गदर्शक तत्वांमध्ये इंग्रजी भाषेचे प्रावीण्य, कौशल्य निकष, आणि कामाचा अनुभव आवश्यक केले आहे. तसेच वर्क व्हिसा वर राहण्याचा कालावधी ५ वर्षावरून ३ वर्षापर्यंत कमी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Explore More

चालू घडामोडी (03 मे 2024)

चालू घडामोडी (03 मे 2024)   चालू घडामोडी (०३ मे २०२४) आगामी सर्व स्पर्धा परीक्षेकरिता उपयुक्त. महत्त्वाच्या सर्व चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे तसेच विश्लेषण. Current affairs in marathi, चालू

चालू घडामोडी (18 मे 2024)

18 मे 2024 (चालू घडामोडी)   चालू घडामोडी (१८ मे २०२४), राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय, खेळ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, भूगोल, अर्थव्यवस्था, पर्यटन, प्रकल्प, महत्त्वाचे दिन, दिनविशेष, महत्त्वाची व्यक्ती, पुरस्कार,

चालू घडामोडी (20 मे 2024)

20 मे 2024 (चालू घडामोडी)   चालू घडामोडी (२० मे २०२४), राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय, खेळ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, भूगोल, अर्थव्यवस्था, पर्यटन, प्रकल्प, महत्त्वाचे दिन, दिनविशेष, महत्त्वाची व्यक्ती, पुरस्कार,