Site icon MPSC Point

केवलप्रयोगी अव्यय

केवलप्रयोगी अव्यय / उद्‌गारवाचक अव्यय

स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात, त्या अनुषंगाने आपण मराठी व्याकरणातील महत्त्वाचा घटक असलेला केवलप्रयोगी अव्यय बघणार आहोत. अव्यय हा घटक व्याकरणात महत्त्वाचा आहे. केवलप्रयोगी अव्ययालाच उद्गारवाचक अव्यय म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. आपल्या मनातील भावना जसे की दुःख, आंनद, आश्चर्य, राग, द्वेष, तुच्छता, इत्यादी व्यक्त करणाऱ्या शब्दांना उद्गारवाचक अव्यय असे म्हणतात. केवळप्रयोग हा वाक्यात केवळ किंवा नुकताच वापरायचा म्हणून वापरला जातो. केवलप्रयोगी अव्यायाबद्दल आपण संपूर्ण माहिती पुढे बघणार आहोत.

 

■ केवलप्रयोगी अव्यय :- केवल म्हणजे केवळ, प्रयोग म्हणजे वापर, ज्या अव्ययांचा वापर वाक्यात केवळ करायचा म्हणून केलेला असतो त्या अव्यांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. केवलप्रयोगी अव्यय आपल्या मनातील भावना दाखवत असतात. आपल्या मनातील भावना जसे की आंनद, दुःख, राग, द्वेष, आश्चर्य, इत्यादी भावना ज्या शब्दांद्वारे दाखवल्या जाते, त्यास केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यापूर्वीच आपल्या मनात दाटून आलेल्या भावना एका उद्‌गाराद्‌वारे व्यक्त होतात. त्या उद्गारांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

 

◆ केवलप्रयोगी अव्यायाची वैशिष्ट्ये :-

I) केवलप्रयोगी अव्यय वाक्याच्या प्रारंभी येतात.
Il) केवलप्रयोगी अव्यय वाक्याच्या प्रारंभी किंवा वाक्याच्या सुरुवातीला येत असून ते वाक्याचा भाग नसते.
Ill) केवलप्रयोगी अव्यया नंतर उद्‌गारवाचक चिन्ह (!) दिले जाते.
IV) केवलप्रयोगी अव्यय वाक्याचा भाग नसतात ते स्वतंत्र उद्‌गार असतात.
V) व्याकरणाच्या दृष्टीने त्यांच्या पुढे येणाऱ्या वाक्यांशी त्यांचा काहीही संबंध नसतो.
Vl) एक – एक उद्‌गार म्हणजे एक – एक वाक्यच असते

◆ केवलप्रयोगी वाक्ये

केवलप्रयोगी अव्यय        वाक्ये
आहाहा !                     मला आंनद झाला.
छे छे !                         माझा विरोध आहे.
अरे बापरे !                  केवढा मोठा साप.

 

◆ केवलप्रयोगी अव्ययाचे वर्गीकरण :- केवलप्रयोगी अव्ययाचे वर्गीकरण त्यांच्या स्वरुपानुसार न ठरविता ते वाक्यात कोणती भावना व्यक्त करतात यावरून ठरविले जाते.

1) हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
वा ! , वा वा ! , आहा ! , ओहो ! , आहाहा !

२) शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
अरेरे! , अयाई ! , आई गं! , अगं आई ! , हाय ! , हाय हाय ! , ऊं ! , अॅ !

3) आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
ऑ ! , ओ हो ! , अबब! , बापरे! , चकचक ! , अरेच्चा !

4) प्रशंसा दर्शक केवलप्रयोगी अव्यय :
शाबास! , भले शाबास! , वाह वाह ! , छान ! , ठीक! , फक्कड! , स्पाशी! , भारी , खासच !

5) संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
हां ! , जी ! , जी हां! , अच्छा ! , ठीक! , बराय !

6) विशेधदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
छे ! , छे छे! , अंह ! , ऊंह! , च ! , छठ ! , हॅट !

7) तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय :
थु: ! , धिक ! , शीड़! , इश्श ! , हुडुत ! , हूज ! , फुस ! , हत् ! , छत ! , छी ! , शी !

8) संबोधन दर्शक केवलप्रयोगी अव्यय :
ए ! , अरे ए! , अगं ! , अगये! , अहो! , अगो! , बांरे!

9) मौनदर्शक
चूप! , चिप ! , गप ! , गपचिप ! , चिडीचूप!

10) व्यर्थ केवलप्रयोगी अव्यय :
जे शब्द वाक्यात येतात परंतु कोणतीही भावना व्यक्त करत नाहीत किंवा त्यांच्यामुळे वाक्यांच्या अर्थात देखील विशेष भर पडत नाही अशा शब्बांना व्यर्थ केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरणार्थ – म्हणे, आपला, छापडा, बेटे, लेका, भावा,

11) पालुपदे [ पादपूरणार्थ ] :-
बोलणाऱ्याची एक लकब असते. त्या लकबीनुसार काही शब्द बोलताना पुनः पुन्हा येतात. त्या शब्दांना पालुपदे असे म्हणतात.
उदाहरणार्थ – बरं का , असं का , होका , कळल , काय कळल , नाही कळलं , जळल मेलं, द्या टाळी, आता, चालतेच की, इत्यादी

★ उदाहरणे :-
1) अरेरे! काय दशा झाली त्याची.
(शोक दर्शक)

2) चूप! एक शब्द बोलू नकोस.
(मौनदर्शक)

3) आहाहा! कीती मोठा आहे हा आंबा.
(हर्षदर्शक)

4) छी! कीती बाणेरडा आहेस तू.
(तिरस्कार दर्शक)

5) छे छे! मी हे अजिबात मान्य करणार नाही.
(नकारदर्शक)

6) अच्छा! मी ही पहाटे पाच वाजता देवळात येईन.
(संमतिदर्शक)

7) बाप रे! कीती उंच मनोरा आहे.
(आश्चर्यदर्शक)

8) ऊं हूं ! आम्ही नाही ऐकणार तुमचे.
(विरोधदर्शक)

9) शबरीने म्हणे रामाला उष्टी बोरे दिली.
(व्यर्थ)

10) नवरा ओरडत होता, बायको आपली शांत उभी होती.
(व्यर्थ)

Exit mobile version